II होळी II-शुभेच्छा क्रमांक-7

Started by Atul Kaviraje, March 18, 2022, 12:37:30 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                              II होळी II
                                          शुभेच्छा क्रमांक-7
                                         -----------------

मित्र/मैत्रिणींनो,

      काल दिनांक-१७.०३.२०२२, गुरुवार होता. "फाल्गुन पौर्णिमेला होलिका दहन होते. अशा परिस्थितीत होलिका दहन फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी १७ मार्च रोजी होणार असल्याने या दिवसाला छोटी होळी असेही म्हणतात." मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवयित्रींनी होलिकोत्सवाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा . चला तर वाचूया, या होळीच्या पर्वावर, लेख, माहिती, होळीचे महत्त्व, कथा, शायरी, निबंध, शुभेच्छा, संदेश आणि बरंच काही.

होळीच करायची तर अहंकाराची, असत्याची,
अन्यायाची, जातीयतेची, धर्मवादाची, हुंडा प्रथेची,
भ्रष्ट्राचाराची, निंदेची, आळसाची,
गर्वाची, दु:खाची होळी करा
--तुम्हाला सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा

टाकून द्या होळीत आयुष्याच्या अडचणी, चिंता, मनाचा गुंता..
करू होम दु:ख, अनारोग्याचा
--होळीच्या हार्दिक शुभेच्छा

नवयुग होळीचा संदेश नवा झाडे लावा,
झाडे जगवा करूया अग्निदेवतेची पूजा..
होळी सजवा गोव-यांनी
--होळीच्या हार्दिक शुभेच्छा

क्षणभर बाजूला सारूया
रोजच्या वापरातले विटके क्षण
गुलाल, रंग उधळूया
रंगूया होळीच्या नशेत विलक्षण
--होळीच्या हार्दिक शुभेच्छा

फाल्गुन मासी येते
होळी खायला मिळते
पुरणाची पोळी रात्री देतात जोरात आरोळी
राख लावतो आपुल्या कपाळी
--होळीच्या हार्दिक शुभेच्छा

होळी, रंगपंचमीचा सण रंगांचा
आगळ्यावेगळ्या ढंगाचा वर्षाव करी आनंदाचा
--होळीच्या रंगीबेरंगी शुभेच्छा

भेटीलागी आले। रंगांचे सोयरे।
म्हणती काय रे। रंग तुझा।।
वदलो बा माझी । पाण्याचीच जात।
भेटल्या रंगात। मिसळतो।।
--होळी आणि धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा

धुळवडीचे रंग खेळताना
पाण्याची नासाडी होणार नाही याची दक्षता घेऊ.
कोरडे आणि नैसर्गिक रंग वापरुन
या सणाचा आनंद द्विगुणित करू.
--होळी आणि धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा

नारिंगी रंग पळसाच्या फुलांचा
हिरवा, गुलाबी, गुलालाचा
पिचकारीत भरून सारे रंग रंगवूया एकमेकांना
--होळीच्या हार्दिक शुभेच्छा

होळी पेटू दे रंग
उधळू दे द्वेष जळू दे
अवघ्या जीवनात नवे रंग भरू दे !
--होळी आणि धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा

फाल्गुन महिन्याची गोळी
गुलाबी आली आली पाहा थंडीत होळी
मनाशी मन मिळवण्यासाठी मनातील द्वेष मिटवण्यासाठी
थोडी तिखट उसळ चण्याची
नंतर मिळते पाहा पोळी पुरणाची
दिवस दुसरा रंगत सणांची सर्वत्र होते उधळण रंगांची
--होळीच्या हार्दिक शुभेच्छा !


--मराठी स्टाईल
---------------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी स्टाईल.कॉम)
                   --------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-18.03.2022-शुक्रवार.