II होळी II-शायरी क्रमांक-1

Started by Atul Kaviraje, March 18, 2022, 12:51:37 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                               II होळी II
                                            शायरी क्रमांक-1
                                           ----------------
मित्र/मैत्रिणींनो,

      काल दिनांक-१७.०३.२०२२, गुरुवार होता. "फाल्गुन पौर्णिमेला होलिका दहन होते. अशा परिस्थितीत होलिका दहन फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी १७ मार्च रोजी होणार असल्याने या दिवसाला छोटी होळी असेही म्हणतात." मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवयित्रींनी होलिकोत्सवाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा . चला तर वाचूया, या होळीच्या पर्वावर कविता, चारोळी इत्यादी.

*****
फाल्गुन महिन्याची गोळी गुलाबी
आली आली पाहा थंडीत होळी
मनाशी मन मिळवण्यासाठी
मनातील द्वेष मिटवण्यासाठी
थोडी तिखट उसळ चण्याची
नंतर मिळते पाहा पोळी पुरणाची
दिवस दुसरा रंगत सणांची
सर्वत्र होते उधळण रंगांची
होळीच्या हार्दिक शुभेच्छा !
*****
होळी पेटू दे
रंग उधळू दे
द्वेष जळू दे
अवघ्या जीवनात
नवे रंग भरू दे !
होळी आणि धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा
*****
आम्रतरूवर कोकीळ गाई
दुःख सारं सरून जाई
नवरंगांची उधलण होई
होळी जीवन गाणे गाई
होळीच्या हार्दिक शुभेच्छा !
*****
भिजू दे रंग आणि अंग स्वच्छंद
अखंड उडू दे मनि रंगतरंग
व्हावे अवघे जीवन दंग
असे उधळू आज हे रंग
होळी सणाच्या हार्दिक शुभेच्छा
******
झाडे लावा, झाडे जगवा
होळीत केरकचरा सजवा
जाळून परिसर स्वच्छ ठेवा
नवयुगी होळीचा संदेश नवा
होळीच्या हरित शुभेच्छा
*****
फाल्गुन मासी येते होळी
खायला मिळते पुरणाची पोळी
रात्री देतात जोरात आरोळी
राख लावतो आपुल्या कपाळी
होळीच्या हार्दिक शुभेच्छा
*****


--AUTHOR UNKNOWN
-------------------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-अजबगजब.कॉम)
                    ------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-18.03.2022-शुक्रवार.