II रंगपंचमी II-लेख क्रमांक-1

Started by Atul Kaviraje, March 18, 2022, 07:48:40 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                          II रंगपंचमी II
                                          लेख क्रमांक-1
                                        ----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१८.०३.२०२२, शुक्रवार, रंगपंचमीचा रंगीत दिवस आहे. "फाल्गुन वद्य पंचमीला प्रामुख्याने महाराष्ट्रात साजरा केला जाणारा हिंदूंचा एक उत्सव. होळी मागोमाग येणारा आणि सर्वांना हवा हवासा वाटणारा दुसरा सण म्हणजे 'रंगपंचमी'. 'रंगपंचमी' हा सण येतो फाल्गुन कृष्णपंचमीला, ह्या दिवशी सर्व लोक रंग खेळतात. एकमेकांच्या अंगावर रंग टाकतात." मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहिणी, कवी-कवयित्रींनी रंगपंचमीच्या हार्दिक रंगीत शुभेच्छा. चला, तर वाचूया, या रंग-सणावर लेख,माहिती, निबंध, शुभेच्छा, शुभेच्छा संदेश,शायरी आणि बराच काही--

     "फाल्गुन वद्य पंचमीला प्रामुख्याने महाराष्ट्रात साजरा केला जाणारा हिंदूंचा एक उत्सव. होळी मागोमाग येणारा आणि सर्वांना हवा हवासा वाटणारा दुसरा सण म्हणजे 'रंगपंचमी'. 'रंगपंचमी' हा सण येतो फाल्गुन कृष्णपंचमीला, ह्या दिवशी सर्व लोक रंग खेळतात. एकमेकांच्या अंगावर रंग टाकतात."

                    रंगपंचमी सणाची संपूर्ण माहिती---

     रंगपंचमी हा सण फाल्गुन वद्य पंचमीला प्रामुख्याने महाराष्ट्रात साजरा केला जातो. हिंदूंचा हा एक उत्सव आहे, या दिवशी एकमेकांच्या अंगावर रंग उडवून लोक आनंदाने, उत्साहाने हा सण साजरा करीत असल्यामुळे या पंचमीला रंगपंचमी असे नाव पडले आहे. मुले-मुली पुरुष एकमेकांना रंगवण्यासाठी ढपडे घेऊन वाजवत वाजवत गटागटाने एकमेकांच्या घरी जातात व त्यांचा हर्ष उत्साहात साजरा करतात. रंगपंचमी हा सण बरेच काही सांगून जातो.

     गेलेल्या कडक उन्हाळ्यापासून अंगाची दाह शांत व्हावी म्हणून रंग उधळले जातात. यावेळी विविध रंगांची चूर्ण पाण्यात मिसळून ते पाणी पिचकाऱ्यामधून एकमेकांच्या अंगावर उडवले जाते. रंग उडविण्याचा उत्साह महाराष्ट्रात फाल्गुन पंचमीला साजरा केला जातो असे असले, तरी उत्तर भारत वगैरे ठिकाणी मात्र तो होळीच्या म्हणजेच फाल्गुन पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो. या उत्सवाच्या निर्मितीमागे धार्मिक व सांस्कृतिक कारण काहीसे अस्पष्ट आहेत.

     परंतु वसंत ऋतु मदन नववर्ष जीर्ण झालेल्या सृष्टीच्या शक्तीचे नूतनीकरण करण्याचा यातून अर्थ निघू शकतो किंवा या उत्सवाशी निगडीत अर्थ असावा असे मानले जाते. धर्मसिंधु या ग्रंथाच्यामध्ये फाल्गुन वैद्य प्रतिपदेला वसंत आरंभाचा उत्सव सुरू होतो. द्वितीयेला शेंदूर, गुलाल, चंदन, बुक्का वगैरे उधळून आनंद सोहळा साजरा केला जातो. हा उत्सव सध्या प्राकृतिक लोक वैद्य पंचमीपर्यंत साजरा करतात. अशी माहिती या ग्रंथाने दिली आहे. यावरून रंगपंचमी हा वसंतोत्सवाचा एक भाग आहे असेही दिसते.

                       रंगपंचमीचे महत्व :---

     रंगपंचमी हा वसंत ऋतूशी संबंधित महत्त्वाचा सण आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीला हा सण साजरा केला जातो. उन्हाचा तडाखा कमी व्हावा आणि थंडावा मिळावा यासाठी एकमेकांच्या अंगावर पाणी उडवून देण्याची रीत आहे. देशाच्या काही भागात रंगपंचमीला धार्मिक दृष्ट्या महत्त्व आहे. वसंत पंचमीच्या दिवशी बलराम मंदिरात या उत्सवाचे सुरुवात होते.

     या दिवशी होळीशी संबंधित लोक गीते गायली जातात. व्रज प्रांतात कृष्णा आणि बळीराम होळीच्या सणाचा आनंद घेत असतात असे मानले जाते. उत्तर प्रदेशात होळीचा आनंद घेण्याला धार्मिक महत्त्व खूप आहे. ज्याप्रमाणे रंगांचे महत्त्व आपल्याला जाणून येते, त्यामध्ये एक संदेश लपलेला आहे, की सर्व जाती धर्मातील लोकांनी एकत्र राहावे. एकमेकांमध्ये भेदभाव करू नये.


--प्रमोद तपासे
-------------

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठीमोल.कॉम)
                     -----------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-18.03.2022-शुक्रवार.