II रंगपंचमी II-लेख क्रमांक-5

Started by Atul Kaviraje, March 18, 2022, 07:55:03 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                           II रंगपंचमी II
                                           लेख क्रमांक-5
                                         ----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१८.०३.२०२२, शुक्रवार, रंगपंचमीचा रंगीत दिवस आहे. "फाल्गुन वद्य पंचमीला प्रामुख्याने महाराष्ट्रात साजरा केला जाणारा हिंदूंचा एक उत्सव. होळी मागोमाग येणारा आणि सर्वांना हवा हवासा वाटणारा दुसरा सण म्हणजे 'रंगपंचमी'. 'रंगपंचमी' हा सण येतो फाल्गुन कृष्णपंचमीला, ह्या दिवशी सर्व लोक रंग खेळतात. एकमेकांच्या अंगावर रंग टाकतात." मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहिणी, कवी-कवयित्रींनी रंगपंचमीच्या हार्दिक रंगीत शुभेच्छा. चला, तर वाचूया, या रंग-सणावर लेख,माहिती, निबंध, शुभेच्छा, शुभेच्छा संदेश,शायरी आणि बराच काही--

                          रंगपंचमी माहिती---

     नमस्कार मित्रांनो! आपले.... या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे, या वेबसाईटवर तुम्हाला विविध माहिती वाचायला मिळेल .आजच्या पोस्टमध्ये आम्ही  " रंगपंचमी माहिती घेवून आलोत. आम्हाला खात्री आहे या वेबसाईटवर सर्व माहिती वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल. भारत देशाची संस्कृती आपल्याला माहित आहेत. देशात दरवर्षी विविध सण साजरे केले जातात.

     प्रत्येक सणातून एक उत्साह आनंद आणि एकोप्याची भावना निर्माण होते. सर्व जातीधर्माचे लोक मिळून हे सण साजरे करतात. अशा प्रकारचं आनंदाचा, उत्साहाचा आणि जल्लोषाचा सर्वांच्या जीवनामध्ये नवीन रंग घेऊन येणारा दुःख विसरून सर्वांना एकाच रंगात रंगून घेणारा सण म्हणजे "रंगपंचमी"होय.

     धुलीवंदना पासून सुरू होणार्‍या वसंत उत्साहाला रंगपंचमीच्या दिवशी पाच दिवस पूर्ण होतात. रंगपंचमी म्हणजेच रंगांचा सण. या दिवशी एकमेकांना रंग लावून आनंदोत्सव साजरा केला जातो.

     बहुतांश जणांचा लोकप्रिय व आवडता सण म्हणून ओळखला जाणारा हा सण म्हणजे रंगपंचमी होत. शहरी भागामध्ये तर खूप मोठ्या प्रमाणात रंगपंचमी हा सण साजरा केला जातो.

        रंगपंचमी सणाचा इतिहास History of Rangpanchami :---

     प्रत्येक सण साजरा करण्या मागचा इतिहास खूप काळापासून चालत आलेला आहे. त्याप्रमाणेच रंगपंचमी हा सणाचा इतिहास सुद्धा द्वारकाधीश म्हणजे श्रीकृष्णाच्या काळापासून चालत आलेला आहे असा उल्लेख पुराणांमध्ये आढळतो.

     द्वारका युगात गोकुळात बाल कृष्णा आपल्या गोपाळ सवंगडी सोबत पिचकारीने रंगीत पाणी उडवीत असे. तीच प्रथा आज आपण रंगपंचमी या नावाने साजरा करतो. मध्ययुगातील संस्थानिक राजे-महाराजे सुद्धा होळी आणि रंगपंचमी चा सण हा अतिशय उत्साहाने साजरा करत असे.

      रंगपंचमी सण केव्हा येतो When does Rangpanchami come ? :---

     रंगपंचमी हा एक रंगाचा सण आहे. फाल्गुन कृष्ण पंचमी या तिथीला संपूर्ण भारतात रंगपंचमी हा सण साजरा केला जातो. मुख्यता महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणारा रंगपंचमीचा हा सण हिंदू धर्माचा एक महत्त्वाचा सण आहे.

     रंगपंचमीच्या या दिवशी एकमेकांच्या अंगावर रंग उडवून लोक आनंदाने, उत्साहाने हा सण साजरा करतात.

     उन्हाळ्याचे दिवसात कडक उन्हापासून अंगाची दाह  शांत व्हावे म्हणून रंग उधळले जातात.

     यावेळी विविध रंगाची चूर्ण पाण्यामध्ये मिसळून ते पाणी एकमेकांच्या अंगावर टाकले जाते.

     रंगपंचमीचा सण भारतामधील विविध राज्यात वेगवेगळ्या तिथीला साजरा केला जातो. जसे की महाराष्ट्रात  फाल्गुन पंचमीला रंगपंचमी साजरा केली जात असेल तर  उत्तर भारताच्या वेगवेगळ्या भागात होळीच्या म्हणजे फाल्गुन पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते.

      तर काही ठिकाणी  धुलीवंदन दिवसापासून रंगपंचमी या पाच दिवसांच्या काळात रंगपंचमीचा सण साजरा केला जातो.

     वसंत ऋतु‌ मदन नववर्ष जीर्ण झालेल्या  सृष्टीच्या शक्तीचे स्वरूप असा रंग पंचमी या सणाचा अर्थ  मानला जातो.

     धर्मसिंधु या ग्रंथामध्ये फाल्गुन वद्य प्रतिपदेला वसंत ऋतूचा आरंभ होतो. द्वितीयेला शेंदूर, गुलाल,चंदन,बुक्का  वगैरे उधळून आनंदसोहळा साजरा केला जातो. परंतु हा उत्सव सध्या प्राकृतिक लोक वैद्य पंचमीला   साजरा करतात असा उल्लेख या ग्रंथांमध्ये आढळतो.


--AUTHOR UNKNOWN
-------------------------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-इन्फॉरमेशन एसे.कॉम)
                   ----------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-18.03.2022-शुक्रवार.