II रंगपंचमी II-लेख क्रमांक-7

Started by Atul Kaviraje, March 18, 2022, 07:58:11 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                          II रंगपंचमी II
                                          लेख क्रमांक-7
                                         ---------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१८.०३.२०२२, शुक्रवार, रंगपंचमीचा रंगीत दिवस आहे. "फाल्गुन वद्य पंचमीला प्रामुख्याने महाराष्ट्रात साजरा केला जाणारा हिंदूंचा एक उत्सव. होळी मागोमाग येणारा आणि सर्वांना हवा हवासा वाटणारा दुसरा सण म्हणजे 'रंगपंचमी'. 'रंगपंचमी' हा सण येतो फाल्गुन कृष्णपंचमीला, ह्या दिवशी सर्व लोक रंग खेळतात. एकमेकांच्या अंगावर रंग टाकतात." मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहिणी, कवी-कवयित्रींनी रंगपंचमीच्या हार्दिक रंगीत शुभेच्छा. चला, तर वाचूया, या रंग-सणावर लेख,माहिती, निबंध, शुभेच्छा, शुभेच्छा संदेश,शायरी आणि बराच काही--

                    रंगपंचमी विषयी काही पौराणिक कथा---

     हिंदू धर्मातील प्रत्येक सण साजरा करण्यामागे पौराणिक आणि प्राचीन कथा आढळतात त्याप्रमाणे रंगपंचमी हा सण साजरा करण्यामागे ही काही प्राचीन कथा,आख्यायिका  प्रचलित आहे.

     पुराण कथेनुसार, शंकराने फाल्गुन पौर्णिमेला मदनाला जाळले होते. त्यानंतर शिव शंकराने पुन्हा मदनाला रंग रूपाने जिवंत केले. त्यामुळे हा आनंद व्यक्त करण्यासाठी रंगपंचमी या सणांची परंपरा चालत आली असावी.

     जीर्ण झालेली सृष्टी होळीमध्ये जळून नष्ट झाली. आता नव्या सृष्टीचा उदय झाला आहे हे यासणा मागचा खरा उद्देश आहे.

     तसेच,हिंदू परंपरेमध्ये  नवीन विवाह झाल्यानंतर त्या जोडप्यांना पहिल्या वर्षी माहेर कडून केसरी रंग उडवलेली नवीन साडी दिली जाते.

     मराठ्याच्या कारकिर्दीत सरदार, प्रतिष्ठित लोक रंगपंचमी मोठ्या उत्साहाने साजरा करत होते असे वर्णन दिसते. रंगपंचमीनिमित्त भरलेल्या दरबारात छोट्या जिजाईने पाच वर्ष वयाच्या शहाजी भोसले यांच्या अंगावर रंग पडल्याने त्यांचे पती

     पत्नी नाते सुचित निबंध पुढे त्यांचा विवाह झाला,अशी आख्यायिका प्रसिद्ध आहे.

   तसेच, रंगपंचमी या सणाविषयी आणखीन एक कथा प्रचलित आहे. भगवान श्रीकृष्णाने मथुरा वृंदावन येथे गोपिकांना सोबत रंगपंचमी खेळण्याचे प्रमाण आहे. त्यांच्यावरची काव्ये आणि चित्रे  खूप लोकप्रिय आहेत.

     तसेच, पुराणांमध्ये एक कथा प्रचलित आहे. हिरण्यकश्यपू  याद त्याला आपला  कुत्रा हा नारायण वेडा आहे हे  सहन झाले नाही. त्यामुळे त्याने स्वतःच्या पुत्राला मारायचे ठरवले. त्यासाठी  हिरण्यकश्यपू  याने आपल्या बहिणीला पाचारण केले. तिचे नाव होते होलिका. पुणे काही स्वभावाने पूर असल्याने ति प्रल्हादाला मारण्यासाठी  आपल्या भावाच्या आज्ञेवरून तयार झाली.

     त्यावेळी होलीकेने आग्निकुंडात तयार केले आणि त्यामध्ये प्रल्हाद ला ढकलून दिले. परंतु भक्त प्रल्हाद  हे नारायण चे मोठे भक्त असल्याने त्यांना काहीही न झाले उलट होलिका त्या अग्नीत जाळून नष्ट झाली. तेव्हापासून होळी हा सण साजरा केला जातो.

     यातुन असे कळते की,  वाईटावर चांगल्याचा विजय हा नक्कीच होत असतो.

     हा सण म्हणजे सृष्टी व दुष्टांचा विजय होतो, हे दर्शवतो.

    आधुनिक काळाची रंगपंचमी Rangpanchami of modern times :---

     रंगपंचमी हा सण आणि ही परंपरा प्राचीन काळापासून चालत आली आहे परंतु आधुनिक काळात या सणाचे वास्तविक रूपे संपूर्णता बदलले आहे.

     खूप प्रगती केली आहे या प्रगती सोबत काही रासायनिक पदार्थाचा मोठ्या प्रमाणात केला जात आहे.

     अशावेळी रंगपंचमी हा संख्या देण्यासाठी वापरले जाणारे रंग कृत्रिम रित्या तयार केले जात आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात रासायनिक घटक, केमिकल्स वापरतात.

     असे रंग जेव्हा आपण एकमेकांना लावतो त्यावेळी हे रासायनिक घटक आपल्या त्वचेवर अपायकारक परिणाम करतात.  त्यातून त्वचेचे बरेचसे रोग उद्भवतात.

      त्यामुळे रंगपंचमी या सणाला वापरले जाणारे रंग हे  कृत्रिम रित्या तयार केलेले नसून नैसर्गिक रित्या तयार केलेले रंग वापरणे आपल्यासाठी फायदेशीर ठरेल.

सुरक्षित रंगपंचमी कशी साजरी करावी How to celebrate Rangpanchami Safely :---

     होळीचा हा सण आनंदाचा उत्साहाचा सण जरी असला, तरीसुद्धा हा सण साजरा करताना सुरक्षितपणे साजरा केला पाहिजे. कारण आज बाजारपेठेमध्ये अनेक रासायनिक घटकांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे कुठलेही रंग वापरताना त्यामध्ये रासायनिक घटक किती प्रमाणात आहेत ते हे बघणे गरजेचे आहे.

     तसेच आपल्या सुरक्षिततेची काळजी सुद्धा घेतली पाहिजे. मुख्यता रंगपंचमीच्या हा सणाला पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. परंतु पाणी न वापरता कोणत्या रंगाचा वापर करणे सर्वांसाठी सुरक्षित ठरेल.

    पाणी हे आपले जीवन आहे त्यामुळे पाण्याचा वापर योग्य रीतीने करणे गरजेचे आहे.


--AUTHOR UNKNOWN
-------------------------

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-इन्फॉरमेशन एसे.कॉम)
                  ----------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-18.03.2022-शुक्रवार.