II रंगपंचमी II-शुभेच्छा आणि संदेश क्रमांक-3

Started by Atul Kaviraje, March 18, 2022, 08:17:49 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                           II रंगपंचमी II
                                    शुभेच्छा आणि संदेश क्रमांक-3
                                   ----------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१८.०३.२०२२, शुक्रवार, रंगपंचमीचा रंगीत दिवस आहे. "फाल्गुन वद्य पंचमीला प्रामुख्याने महाराष्ट्रात साजरा केला जाणारा हिंदूंचा एक उत्सव. होळी मागोमाग येणारा आणि सर्वांना हवा हवासा वाटणारा दुसरा सण म्हणजे 'रंगपंचमी'. 'रंगपंचमी' हा सण येतो फाल्गुन कृष्णपंचमीला, ह्या दिवशी सर्व लोक रंग खेळतात. एकमेकांच्या अंगावर रंग टाकतात." मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहिणी, कवी-कवयित्रींनी रंगपंचमीच्या हार्दिक रंगीत शुभेच्छा. चला, तर वाचूया, या रंग-सणावर लेख,माहिती, निबंध, शुभेच्छा, शुभेच्छा संदेश,शायरी आणि बराच काही--

             रंगपंचमी स्टेटस मराठी (Rangpanchami Status)---

चला यंदा साजर करु रंगपंचमीचा सण..
आणि आणू रंग नसलेल्यांचा आयुष्यात रंगाचे काही क्षण
तुला पाहता रंग ही झाले फिके. ...
तू आयुष्यात आलीस तर रोजच साजरी होईल रंगपंचमी आनंदाने
रंग घेऊनी तुझ्या आवडीचे यंदा साजरी करु रंगपंचमी..
त्यासाठी येशील ना तू माझ्या जवळी
रंग येता हाती...
झाला मला तुला रंग लावण्याचा मोह...
चल ये ना साजरा करुया रंगपंचमीचा सण हा सोबत दोघं
रंगपंचमीचा सण हा आला...
रंगात न्हाऊन निघाण्याचा क्षण हा आला
रंगुया रंगात रंगपंचमीच्या साजरा करु हा आनंद
आज साजरा करुया सण रंगपंचमीचा...
तुम्हा सगळ्यांना रंगपंचमीच्या शुभेच्छा!
तुझा आवडता रंग कोणता? विचारतोय..
कारण आज त्याच रंगाने
रंगात रंग तो शाम रंग....
--रंगपंचमीच्या शुभेच्छा

चला रंगात रंगूया..
चला रंगपंचमी साजरा करुया...
--रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

        रंगपंचमी चारोळ्या – Rangpanchami Charolya/Shayari---

रंगात रंगुनी जाऊ
सुखात चिंब न्हाऊ
जीवनात राहु दे रंग
सौख्याचे आनंद तरंग
--रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा
रंग नात्यांचा , रंग बंधाचा
रंग हर्षाचा, रंग उल्हासाचा
रंग नव्या उत्सवाचा
--रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

रंग लागू दे, स्नेह जागू दे
नाती जोडू चला
उल्हासाने साजरा करु
हा रंगोत्सव
--रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

रंग न जाणती जात न भाषा
चला उडवू रंग
वाढू दे प्रेमाची नशा
साजरी करु धुळवड.. ही मनी आशा
तनमनाला रंगवून जाते ही रंगपंचमी
मनी आनंद आणते ही रंगपंचमी
रंगूनी जाऊ रंगात आता
अखंड उठू दे मनी तरंग
तोडून सारे बंध सारे
असे उधळुया आज हे रंग
--रंगपंचमीच्या शुभेच्छा!

रंगपंचमीचे रंग जणू एकमेकांच्या रंगात रंगतात
असूनही वेगळे रंग, रंग स्वतरुच्या विसरुनी
एकीचे महत्व सांगतात
--रंगपंचमीच्या शुभेच्छा!

रंगपंचमी येते सगळ्यांना रंगवून जाते
रंग निघून जातात
पण तुमच्या प्रेमाचा रंग तसाच टिकून राहतो
रंग काय लावायचा
जो आज आहे उद्या निघून जाईल
लावायचा तर जीव लाव
जो आयुष्यभर टिकेल.
रंगाच्या उत्सवात नाचत आहे मन माझे
रंगात मन माझे आज झुलत आहे
--रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

     हे आनंदी शुभेच्छा संदेश पाठवून तुमचा आजचा दिवस साजरा करा. तुम्हा सगळ्यांना रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !


--लिनल गावडे
--------------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.popxo.कॉम)
                   ---------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-18.03.2022-शुक्रवार.