"१८-मार्च–दिनविशेष"

Started by Atul Kaviraje, March 19, 2022, 12:21:01 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     काल दिनांक-१८.०३.२०२२-शनिवार होता. जाणून घेऊया,कालच्या दिवसाचे "दिन-विशेष"

                                     "१८-मार्च–दिनविशेष"
                                    --------------------

अ) १८ मार्च रोजी झालेल्या घटना.
   ---------------------------

१८५०: हेन्‍री वेल्स आणि विल्यम फार्गो यांनी अमेरिकन एक्सप्रेस ची स्थापना केली.

१९२२: महात्मा गांधींना असहकार आंदोलनाबद्दल ६ वर्षे तुरूंगवास,

१९४४: नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेने ब्रह्यदेशमार्गे प्रवेश करुन भारताच्या शान्य सीमेवर ब्रिटिशांचा पाडाव करुन तिरंगा फडकावला.

१९६५: अवकाशयात्री अलेक्सए लेओनोव १२ मिनिटे अंतराळात चालणारे पहिले वव्यक्ती ठरले.

२००१: सरोदवादक अमजद अली खान यांना गंधर्व पुरस्कार तर तर बंगाली अभिनेत्री सावित्री चटर्जी यांना अप्सरा पुरस्कार जाहीर.

=========================================

ब) १८ मार्च रोजी झालेले जन्म.
  -------------------------

१५९४: शहाजी राजे भोसले यांचा जन्म. (मृत्यू: २३ जानेवारी १६६४)

१८५८: डिझेल इंजिनचा संशोधक रुडॉल्फ डिझेल यांचा जन्म. (मृत्यू: २९ सप्टेंबर १९१३)

१८६७: आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार व पोस्ट कार्ड आर्टिस्ट महादेव विश्वनाथ धुरंधर यांचा जन्म. (मृत्यू: १ जून १९४४)

१८६९: इंग्लंडचे पंतप्रधान नेव्हिल चेंबरलेन यांचा जन्म. (मृत्यू: ९ नोव्हेंबर १९४०)

१८८१: स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार, राष्ट्रमत आणि स्वतंत्र हिन्दुस्तान चे संपादक वामन गोपाळ तथा वीर वामनराव जोशी यांचा जन्म. (मृत्यू: ३ जून १९५६)

१९०१: शब्दकोशकार, अनेक शैक्षणिक संस्थांचे संस्थापक कृष्णाजी भास्कर तथा तात्यासाहेब वीरकर यांचा जन्म.

१९०५: लेखिका मालती बेडेकर ऊर्फ विभावरी शिरुरकर यांचा जन्म. (मृत्यू: ७ मे २००१)

१९१९: केन्द्रीय गृहमंत्री आणि कम्युनिस्ट पक्षाचे नेते इंद्रजित गुप्ता यांचा जन्म. (मृत्यू: २० फेब्रुवारी २००१)

१९२१: भारतीय राजकारणी, केंद्रीय मंत्री व बी. सी. सी. आय. चे अध्यक्ष एन. के. पी. साळवे यांचा जन्म. (मृत्यू: १ एप्रिल २०१२)

१९३८: अभिनेता बलबीरराज पृथ्वीराज कपूर तथा शशी कपूर यांचा जन्म.

१९४८: अष्टपैलू क्रिकेटपटू एकनाथ सोलकर यांचा जन्म. (मृत्यू: २६ जून २००५)

१९८९: भारतीय क्रिकेट खेळाडू श्रीवत्स गोस्वामी यांचा जन्म.

=========================================

क) १८ मार्च रोजी झालेले मृत्यू.
   ------------------------

१९०८: ब्रिटिश हवामानशास्त्रज्ञ सर जॉन इलियट यांचे निधन. (जन्म: २५ मे १८३१ – लॅम्सले, डरहॅम, यू. के.)

१९४७: जनरल मोटर्स आणि शेवरलेट कंपनी चे सहसंस्थापक विल्यम सी ड्युरंट यांचे निधन. (जन्म: ८ डिसेंबर १८६१)

२००१: चित्रकार विश्वनाथ नागेशकर यांचे निधन.

२००३:  ओस्बोर्न कॉम्पुटर कॉर्पोरेशन चे संस्थापक अॅडम ओस्बोर्न यांचे निधन. (जन्म: ६ मार्च १९३९)

=========================================


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.03.2022-शनिवार.