II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II-शुभेच्छा क्रमांक-4

Started by Atul Kaviraje, March 20, 2022, 05:38:35 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                              II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II
                                        शुभेच्छा  क्रमांक-4
                            -----------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

      उद्या दिनांक-२१.०३.२०२२-सोमवार, छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती आहे. यंदा फाल्गुन वद्य तृतीया ही 21 मार्च 2022 दिवशी आहे. त्यामुळे काही शिवभक्त या दिवशी देखील शिव जयंती साजरी करणार आहेत. महाराष्ट्रात अनेक मराठी सण परंपरेनुसार तिथीवर साजरी करण्याची पद्धत आहे त्यानुसार शिवजयंती देखील तिथी वर देखील तितक्याच उत्साहात साजरी केली जाते. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवयित्रींनी शिव-जयंतीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया या सुमुहूर्तावर लेख,भाषण,निबंध,शुभेच्छा,कोट्स,स्टेटस,सुविचार,शायरी,पोवाडे आणि बरंच काही.

"शिवराय" हे फक्त नाव
नव्हे तर ,जगण्याची प्रेरणा
आणि यशाचा मंत्र आहे👌

भगव्या रक्ताची धमक बघ, स्वाभीमानाची आहे !!
घाबरतोस कुणाला वेड्या तु तर शिवबांचा
"वाघ" आहे,

ज्यांचे नाव घेता सळसळते रक्त अशा
*शिवरायांचे आम्ही भक्त,,,*
*!!"जय जिजाऊ"!!*
*!!'जय शिवराय'!!*
*!!"जय शंभुराजे"!!*

।। माझ्या रक्ताने धूतले जरी तुमचे पाय,
तुमचे माझ्या वरचे ऊपकार फिटणार नाय,
धन्य धन्य माझे शिवराय
!! जय जिजाऊ !! !! जय शिवराय !!
          !! जय शंभूराय !!

"एक लहान पाउल लहान लक्ष्यावर साध्य केले जाते,
नंतर नंतर मोठे लक्ष्य."

"समोर संकट दिसलं ना त्या संकटाच्या
डोक्यावर पाय ठेवून उभं रहायचं आणि फक्त
झुंजायचं आणि विजय मिळत नाही तोपर्यंत
माघार घ्यायची नाही....!

"स्वातंत्र्य एक वरदान आहे
ज्यास मिळवण्यास सर्व पात्र आहे."

"एखादे झाड, जे इतके उच्चजीव अस्तित्व असते,
एखाद्याकडून दगड मारले गेले तरी
गोड आंबे देणे थांबवत नाही
जर ते इतके सहनशील व दयाळू असू शकते;
म्हणून राजा म्हणून मी झाडापेक्षा
अधिक सहनशील आणि दयाळू का नसावे?"
सळसळत रक्त ,शिवबाचे भक्त आणि कपाळी

भगवा टिळा
अरे आलं आलं वादळ अन कोण अडविल या वादळा
आलाच कोणी आडवा तर त्याचा वाजवू आम्ही
खुळखुळा
अय...नाद करायचा नाही आमचा नादच खुळा
छाती ठोकून सांगतो जगाला शिवबाचा मावळा
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !

गाठ बांधून घे " काळजाशी " अशी जी सुटणार
नाही ,
ही आग आहे " इतिहासाची " जी विझणार
नाही ,
मी धगधगता प्राण " स्वराज्याचा " मरणार
नाही ,
" शिवछत्रपतींच्या " किर्तीला शब्द माझे
पुरणार नाही .

छ-छत्तीस हत्तीचे बळ असणारे
त्र-त्रस्त मोगलांना करणारे
प-परत न फिरणारे
ती-तिन्ही जगात जाणणारे
शी-शिस्त प्रिय
वा-वाणीज तेज
जी-जिजाऊंचे पुत्र
म-महाराष्ट्राची शान
हा-हार न मानणारे
रा-राज्याचे हितचिंतक
ज-जनतेचा राजा


--किशन
---------

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-rawneix.इन)
                     ----------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-20.03.2022-रविवार.