II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II-शुभेच्छा क्रमांक-7

Started by Atul Kaviraje, March 20, 2022, 05:43:42 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                              II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II
                                        शुभेच्छा  क्रमांक-7
                            ------------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

      उद्या दिनांक-२१.०३.२०२२-सोमवार, छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती आहे. यंदा फाल्गुन वद्य तृतीया ही 21 मार्च 2022 दिवशी आहे. त्यामुळे काही शिवभक्त या दिवशी देखील शिव जयंती साजरी करणार आहेत. महाराष्ट्रात अनेक मराठी सण परंपरेनुसार तिथीवर साजरी करण्याची पद्धत आहे त्यानुसार शिवजयंती देखील तिथी वर देखील तितक्याच उत्साहात साजरी केली जाते. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवयित्रींनी शिव-जयंतीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया या सुमुहूर्तावर लेख,भाषण,निबंध,शुभेच्छा,कोट्स,स्टेटस,सुविचार,शायरी,पोवाडे आणि बरंच काही.

अनेक झाले पुढेही होतील
अगणित ह्या भुमीवरती
जाणता राजा एकची झाला
तो फक्त "राजा शिवछत्रपती"।। १ ।।

धर्म मराठा अभय मिळाले
सर्व समानभान नित्य आचरले
भगवा झेंडा घेऊन हाती
केली चहूकडे जनजागृती
तो फक्त "राजा शिवछत्रपती"।। २ ।।

जिजाऊ माऊली दिव्य प्रेरणा
गुरू तुकाराम देऊ ज्ञाना
धाडसी मावळे भवानी सोबती
म्हणे हरहर महादेव गर्जती
तो फक्त "राजा शिवछत्रपती"।। ३ ।।

स्वारी केली किल्ले घेऊनी
काही जिंकुन काही बाधून
मोगल नमले शिकस्त संपली
भल्याभल्यांची झोप उडवीली
तो फक्त "राजा शिवछत्रपती"।। ४ ।।

रयतेचं राज्य स्थापनेसाठी
मावळे जमले विजयासाठी
ऐक्यासाठी दिली आहुती
मिळाली ज्यांना विरगती
तो फक्त "राजा शिवछत्रपती"।। ५ ।।

मराठा राजा महाराष्ट्राचा
म्हणती सारे माझा – माझा
आजही गौरव गिते गाती
ओवाळूनी पंचारती
तो फक्त "राजा शिवछत्रपती"।। ६ ।।
|| जय जिजाऊ ||...
|| जय शिवराय ||....
|| जय शंभुराजे|

थोर तुझे उपकार जाहले,
सुर्य तेजात चांदने नाहले,
जगी रयतेने ते तुझे स्वराज्य पाहले,
आठवुन तुझ्या शिवशाहीला,
अश्रु माझे ईथेच वाहले ...
!! जय_शिवराय_जय_शिवशाही !!

मी प्रत्येक वादळ पेलिन,
मला आत्मविश्वास आहे...
माझ्या पायाशी जमिन,
पाठीशी आकाश आहे...
पाय जमीनीत घट्ट रोवुन,
मी सह्याद्रिसारखा ताठ आहे..
जाउन सांगा वादळांना,
तुमचि 'शिवबाच्या मावळ्यांशी' गाठ
आहे.....
!!जय महाराष्ट्र !!
!!जय भवानी!!
🚩🚩जय जिजाऊ🚩🚩
🚩🚩जय शिवराय🚩🚩
  🚩🚩जय शंभुराजे🚩🚩


--किशन
---------

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-rawneix.इन)
                    -----------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-20.03.2022-रविवार.