II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II-शुभेच्छा क्रमांक-8

Started by Atul Kaviraje, March 20, 2022, 05:45:21 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                              II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II
                                       शुभेच्छा  क्रमांक-8
                            -----------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

      उद्या दिनांक-२१.०३.२०२२-सोमवार, छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती आहे. यंदा फाल्गुन वद्य तृतीया ही 21 मार्च 2022 दिवशी आहे. त्यामुळे काही शिवभक्त या दिवशी देखील शिव जयंती साजरी करणार आहेत. महाराष्ट्रात अनेक मराठी सण परंपरेनुसार तिथीवर साजरी करण्याची पद्धत आहे त्यानुसार शिवजयंती देखील तिथी वर देखील तितक्याच उत्साहात साजरी केली जाते. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवयित्रींनी शिव-जयंतीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया या सुमुहूर्तावर लेख,भाषण,निबंध,शुभेच्छा,कोट्स,स्टेटस,सुविचार,शायरी,पोवाडे आणि बरंच काही.

🚩🚩⚔🐯⚔🚩🚩
धरती आभाळा शिवाय झाकत नाय,
वादळ पर्वता शिवाय कापत नाय,
आम्ही शिवभक्त आहोत मित्रांनो,
शिवराय शिवाय कोणा पुढे झुकत नाय"
🚩 जय शिवराय 🚩

माझ्याही शिवबांच एक राज्य होत,
जगाहून सुंदर अस ते स्वराज्य होत ll
सुख शांती समाधान नांदत जिथे,
अस ते एक बहूजन स्वराज्य होत ll
जाती धर्म पंथाचा भेदभाव नव्हता,
न्याय हा सर्वांसाठी एक समान होता ll
न्यायासाठी प्राण गेला तरी चालेल,
पण अन्याय कुणावर झाला नव्हता ll
राज्यांचा राज्य कारभार असा होता,
गवताची कIडी सुद्धा गहाण नव्हती ll
स्वतःसाठी सारेच जगतात या जगी,
रयतेसाठी जगणारे शिवराय होते ll
स्वराज्यासाठी अर्पीले प्राण ज्यांनी,
अवघा महाराष्ट्र घडविला हो त्यांनी ll
कितीही गुणगान केले तरी कमीच,
असे अमुचे छत्रपती शिवराय होते ll

🚩रथी_महारथी जन्मले या भुमीवरती
🚩 आमुच्या काळजात दिसेल फक्त शिवरायांची मुर्ती..
🚩नसा_नसात दौडतो शिवसिंह_छावा..
मान झुकते आठवून तुमची किर्ती..🚩 ?
***|| जय जिजाऊ जय शिवराय ||* *⛳

देवा_जन्म_देऊ_नको_दुसरा_
माझं_या_जन्मातच_सार्थक_झाल_
पण_तरी_तुझी_ईच्छा_झालीच_तर
महाराष्ट्रात_दे_आणि_मला_माझ्या
‎शिवबाच्या_पायाची
पायधुळ_होऊ_दे ........
रक्तात_भगवा_ओठात_शिवबा
🚩जय शिवराय🚩

*राजे तुम्ही येणार म्हणून सजली ही धरती
तुमच शौर्य पाहुन पोहचली जग भर किर्ती..
वेढ लागला तुमच्या आगमनाची..
पाय धूळ व्हावे तुमच्या चरणाची..।
एवडीच इच्छा या *मावळयाची..।*🚩
🚩जगदंब🚩
जय जिजाऊ जय शिवराय

-छाताडावर -टकरून -फुटल्यात -हाजारो
         शिळा
-तेव्हांच -लागला – या – मस्तकी -टिळा
-अरे – फुलवीला – आमच्या – रक्ताने -स्वराज्याचा -मळा ?? ??
!!! म्हणुन – म्हणतो – "" शिवबाच्या """
शिवभक्तांनचा – नादच लय खुळा ......
🚩🚩🚩🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे🚩🚩🚩🚩🚩

सह्याद्रीच्या कडेकपारी,
घुमतो वारा तुझ्या नामाचा,
कृष्णा गोदा भीमा तापी,
घागर भरती तुझ्या कृपेच्या..
जय शिवराय🙏

मुखात जंगदब नामघोष आहे,
मनात शिवरायाचे तेजस्वी विचार आहेत,
अंगात शिवशभूचा रंग आहे,
म्हणून गर्वाने सांगतो,
मी शिवबांचा भंक्त आहे.
🚩जय जिंजाऊ🚩 जय शिवराय

सह्याद्रीच्या छाताडातून,
नाद भवानी गाजे
काळजात राहती अमुच्या,
रक्तात वाहती राजे !!
तुफ़ान गर्जतो, आग ओकतो,
वाघ मराठी माझा !
सन्मान राखतो, जान झोकतो
तुफानं मातीचा राजा !


--किशन
---------

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-rawneix.इन)
                    -----------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-20.03.2022-रविवार.