II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II-शुभेच्छा क्रमांक-12

Started by Atul Kaviraje, March 20, 2022, 05:52:46 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                               II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II
                                       शुभेच्छा  क्रमांक-12
                             -----------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

      उद्या दिनांक-२१.०३.२०२२-सोमवार, छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती आहे. यंदा फाल्गुन वद्य तृतीया ही 21 मार्च 2022 दिवशी आहे. त्यामुळे काही शिवभक्त या दिवशी देखील शिव जयंती साजरी करणार आहेत. महाराष्ट्रात अनेक मराठी सण परंपरेनुसार तिथीवर साजरी करण्याची पद्धत आहे त्यानुसार शिवजयंती देखील तिथी वर देखील तितक्याच उत्साहात साजरी केली जाते. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवयित्रींनी शिव-जयंतीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया या सुमुहूर्तावर लेख,भाषण,निबंध,शुभेच्छा,कोट्स,स्टेटस,सुविचार,शायरी,पोवाडे आणि बरंच काही.

     शिवजयंती शुभेच्छा मराठी 2022 | Shivjayanti Wishes in marathi | Chatrapati shivaji maharaj status in marathi.
शिवजयंती स्टेटस ,शुभेच्छा, संदेश, पोवाडे , कविता, मेसेज, शायरी मराठीमधे २०२२.⛳

     नमस्कार सर्व शिवभक्तांचे शिवजयंती शुभेच्छा मराठी / Shivjayanti Wishes in marathi आजच्या आपल्या पोस्टमध्ये स्वागत आहे.छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिवजयंती दरवर्षी 19 फेब्रुवारी रोजी साजरी केली जाते. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी झालता. तथापि, तिथीनुसार, या वर्षी आज फाल्गुन चतुर्थी 21 मार्च 2022 रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी केली जाईल.

     छत्रपती शिवाजी महाराज एक बलवान आणि चातुर्य आणि निर्भय मराठा योद्धा होते ज्यांनी स्वराज्याची स्थापना केली आणि मुघल सम्राट औरंगजेब विरुद्ध लढले. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त काही शुभेच्छा, संदेश, एसएमएस, कोट्स, फेसबुक आणि व्हॉट्सअँप स्टेटस ( Shivjayanti chya hardik shubhechha in marathi )येथे आज दिलेले आहेत.

    शिवजयंती शुभेच्छा मराठी / Shivjayanti wishes in marathi 2022---

#अखंड_ महाराष्ट्रचे आराध्य दैवत
#श्रीमंतयोगी_ छत्रपती शिवाजी महाराज
जयंतीनिमित्त
⛳#सर्व शिवभक्तांना_ हार्दिक भगव्या
शिवमय हार्दिक शुभेच्छा.⛳

सागराचे पाणी कधी आटणार नाही...
स्वराज्याची आठवण कधी मिटणार नाही...
हा जन्म काय, हजार जन्म झाले
तरी.....
नाद "शिवरायांचा" सुटणार नाही..
!! जय भवानी जय शिवाजी !!.
⛳शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा २०२२!⛳

रथी_महारथी जन्मले या भुमीवरती
आमुच्या काळजात दिसेल फक्त शिवरायांची मुर्ती..
नसा_नसात दौडतो शिव सिंह_छावा..
मान झुकते आठवून तुमची किर्ती.🙏
***|| जय जिजाऊ जय शिवराय ||* *⛳

     छत्रपती शिवाजी महाराज स्टेटस मराठी / Chatrapati Shivaji maharaj status in marathi---

!!शरीर माणसाचे काळीज वाघाचे..
हिच तर त्यांची अदा आहे !
म्हणुनच तर महाराष्ट्राची जणता
माझ्या "शिवरायावर" फिदा आहे..!!
⛳||॰||॰|| ખય શિવરાય ||॰|⛳

ताशे तडफणार ...
ह्रदय❤ धडकणार ...
मन थोडे भडकणार ......
पण या देशावरच ⚔काय ...
अख्याजगावर
" 19_फेब्रुवारी " ला "⛳भगवा⛳
झेंडा फडकणार 🚩जयशिवराय🚩


--by योरसेल्फ स्टेटस
--------------------

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-योरसेल्फ स्टेटस.कॉम)
                  ----------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-20.03.2022-रविवार.