II छत्रपति शिवाजी महाराज जयंती II-चारोळी क्रमांक-1

Started by Atul Kaviraje, March 20, 2022, 06:07:27 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                              II छत्रपति शिवाजी महाराज जयंती II
                                         चारोळी क्रमांक-1
                            -----------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

      उद्या दिनांक-२१.०३.२०२२-सोमवार, छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती आहे. यंदा फाल्गुन वद्य तृतीया ही 21 मार्च 2022 दिवशी आहे. त्यामुळे काही शिवभक्त या दिवशी देखील शिव जयंती साजरी करणार आहेत. महाराष्ट्रात अनेक मराठी सण परंपरेनुसार तिथीवर साजरी करण्याची पद्धत आहे त्यानुसार शिवजयंती देखील तिथी वर देखील तितक्याच उत्साहात साजरी केली जाते. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवयित्रींना शिव-जयंतीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया या सुमुहूर्तावर काही चारोळी, कविता, शायरी इत्यादी--

     शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश शायरी चारोळी मराठी | shivaji maharaj jayanti quotes in marathi 2022| shiv jayanti chya hardik shubhechha in marathi shiv jayanti wishes in marathi 2022

     फेब्रुवारी महिना आला की आपल्या सर्वांना वेध लागते ते आपल्या राज्याच जयंतीचे म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे दरवर्षी पण 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तारखेप्रमाणे साजरी करत असतो या वर्षीसुद्धा 19 फेब्रुवारी 2022 रोजी आपण शिवाजी महाराजांची जयंती धुमधडाक्यात साजरी करणार आहोत याच शिवजयंतीच्या शुभेच्छा संदेश मराठीत ( shiv jayanti quotes wishes in marathi ) देण्यासाठी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या काही चारोळ्या कविता स्टेटस शायरी घेऊन आलो आहोत नक्कीच आपणास शिवजयंती स्टेटस व्हाट्स अप वर फेसबुक वर इंस्टाग्राम वर किंवा शेअर चॅट वर स्टेटस ठेवून छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीच्या शुभेच्छा देऊ शकता .

नभी चंद्र, सूर्य, तारे, सारे मिळूनी जयघोष करती !
त्रिखंडात गाजत राही, अशी शिवबांची कीर्ती !!

राजे तुम्हीच अस्मिता ,तुम्ही महाराष्ट्राची शान !
जगती तुम्ही 'छत्रपती' तुम्हीच आमचा स्वाभिमान !!

सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा..!
दरीदरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा !!

वंदन तुजला शतदा करते, धन्य तू शिवराया !
स्त्री जातीचा मान राखला, तूच शिकवले जगाया !!

जगणारे ते मावळे होते
जगवणारा तो महाराष्ट्र होता
पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून
जनतेकडे मायेने हात फिरवणारा
तो आपला "शिवबा" होता
जय शिवराय

सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला
भगवा टीळा चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला
हातात घेऊनी तलवार शत्रुंवर गरजला
महाराष्ट्रात असा एकच शिवाजी राजा होऊन गेला

दगड झालो तर "सह्याद्रीचा" होईन!
माती झालो तर "महाराष्ट्राची" होईन!
तलवार झालो तर "भवानी मातेची" होईन!
आणि.... पुन्हा मानव म्हणून जन्म मिळाला
तर "शिवरायांचा मावळा" होईन!!

अंधार फार झाला, आता दीवा पाहिजे,
राष्ट्राला पुन्हा एकदा, जीजाऊंचा शिवा पाहिजे!

मूर्तीकेचे पावित्र्य तव राखीले
स्वराज्यस्वप्न तव साकारिले..
गर्जुनिया केलासी हिंदोत्सव साजरा
शिवराजा तूज मानाचा मुजरा...


--AUTHOR UNKNOWN
-------------------------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी भाषण.कॉम)
                   --------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-20.03.2022-रविवार.