II छत्रपति शिवाजी महाराज जयंती II-चारोळी क्रमांक-3

Started by Atul Kaviraje, March 20, 2022, 06:10:39 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                              II छत्रपति शिवाजी महाराज जयंती II
                                        चारोळी क्रमांक-3
                            -----------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

      उद्या दिनांक-२१.०३.२०२२-सोमवार, छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती आहे. यंदा फाल्गुन वद्य तृतीया ही 21 मार्च 2022 दिवशी आहे. त्यामुळे काही शिवभक्त या दिवशी देखील शिव जयंती साजरी करणार आहेत. महाराष्ट्रात अनेक मराठी सण परंपरेनुसार तिथीवर साजरी करण्याची पद्धत आहे त्यानुसार शिवजयंती देखील तिथी वर देखील तितक्याच उत्साहात साजरी केली जाते. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवयित्रींना शिव-जयंतीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया या सुमुहूर्तावर काही चारोळी, कविता, शायरी इत्यादी--

झंझाविला भगव्याचा समान तुम्ही,
जागविले मरगळलेले मर्द मावळे तुम्ही,
घडविले श्री चे स्वराज्य तुम्ही,
ऐसे श्रीमंत योगी अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत
श्री राजा शिवछत्रपती तुम्हीं

विजेसारखी तलवार चालवून गेला,
निधडया छातीने हिंदुस्थान हालवून गेला,
वाघनख्याने अफजलखानाचा कोथळा फाडून गेला,
मूठभर मावळ्यांना घेऊन हजारो सैतानांना नडून गेला,
स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकून मुजरा केला,
असा एक मर्द मराठा शिवबा होऊन गेला

हिंदू धर्म राखिले गर्जनिया केलासी स्वराज्य साजरा
स्वराज्य स्वप्न साकारिले छत्रपती शिवराजा तूज मानाचा मुजरा.

राजे आजवर असंख्य जाहले, पण,
शिवबा सारखा कुणी न जाहला,
गर्व असे आज महाराष्ट्राला
एकच राजा तो शिवबा जाहला

सिंहाची चाल, गरूडाची नजर,
स्त्रीयांचा आदर, शत्रूचे मर्दन,
असेच असावे मावळ्यांचे वर्तन,
हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण....

शिवाजी या नावाला कधी उलट वाचलं आहे का?
जीवाशी असा शब्द तयार होतो..
जो आयुष्यभर जीवाशी खेळला तो शिवाजी!

गगनभेदी नजर ज्यांची,
पहाडासम विशाल काया धगधगता सुर्य झुकतो,
वंदितो प्रभू शिवराया

प्रजेला ज्यांनी समजले माय बाप,
मात्र शत्रूंचा झाला थरकाप
स्त्रीला दिला मातेचा सन्मान,
छत्रपती शिवरायांचा आहे, आम्हाला अभिमान

"एक राजा जो रयतेसाठी जगला,
एक योध्दा जो अन्यायाविरुद्ध लढला..
एक नेता जो लोकहितासाठी झटला,
एक असामान्य माणूस ज्याने,
गुलामगिरी नाकारून स्वराज्याला जन्म दिला. "

आले किती गेले किती,
उडून गेले भरारा...
संपला नाही आणि संपणार नाही
माझ्या शिवबांचा दरारा."

"जिथे शिवभक्त उभे राहतात,
तिथे बंद पड़ते भल्या-भल्यांची मती..
अरे मरणाची कुणाला भीती?
आदर्श आमचे राजे शिवछत्रपती."

स्त्रीयांचा आदर, शत्रूचे मर्दन...
असेच असावे, मावळ्यांचे वर्तन...
हीच छत्रपती शिवरायांची शिकवण.

"शिवरायांचे आठवावे रूप,
शिवरायांचा आठवावा प्रताप,
शिवरायांचा आठवावा साक्षेप,
भूमंडळी. "


--AUTHOR UNKNOWN
-------------------------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी भाषण.कॉम)
                   --------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-20.03.2022-रविवार.