II छत्रपति शिवाजी महाराज जयंती II-शेर शायरी क्रमांक-1

Started by Atul Kaviraje, March 20, 2022, 06:16:19 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                              II छत्रपति शिवाजी महाराज जयंती II
                                       शेर शायरी क्रमांक-1
                            -----------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

      उद्या दिनांक-२१.०३.२०२२-सोमवार, छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती आहे. यंदा फाल्गुन वद्य तृतीया ही 21 मार्च 2022 दिवशी आहे. त्यामुळे काही शिवभक्त या दिवशी देखील शिव जयंती साजरी करणार आहेत. महाराष्ट्रात अनेक मराठी सण परंपरेनुसार तिथीवर साजरी करण्याची पद्धत आहे त्यानुसार शिवजयंती देखील तिथी वर देखील तितक्याच उत्साहात साजरी केली जाते. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवयित्रींना शिव-जयंतीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया या सुमुहूर्तावर काही चारोळी, कविता, शायरी इत्यादी--

झनझविला भगव्याच्या समान तुम्ही,
जागविले मरगळलेले मर्द मावळे तुम्ही,
घडविले श्रीं चे स्वराज्य तुम्ही,
ऐसे श्रीमंत योगी अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत,
श्री राजा शिवछञपती तुम्ही... !!

लखलख चमचम तळपत होती
शिवबाची तलवार,
महाराष्ट्रला घडविणारे तेचं खरे शिल्पकार...
"श्री राजा शिवछञपती"
यांच्या चरणी मानाचा ञिवार मुजरा
जय शिवराय, जय महाराष्ट्र

मराठा राजा महाराष्ट्राचा
म्हणती सारे माझा – माझा
आजही गौरव गिते गाती
ओवाळूनी पंचारती
तो फक्त "राजा शिवछत्रपती"
|| जय जिजाऊ ||
|| जय शिवराय ||

सुर्य नारायण जर उगवले नसते तर..
आकाशाचा रंगचं समजला नसता..
जर छञपती शिवाजी राजे जन्मले नसते तर..
खरचं हिंदु धर्माचा अर्थच समजला नसता..
हे हिंदु प्रभो शिवाजी राजा

हवेत झेप घ्यायची असेल तर पक्षासारखं बळ हवं ...
दरीत झेप घ्यायची असेल तर आकाशाएवढं धाडस हवं...
पाण्यात उडी घ्यायची असेल तर माशा सारखी कला हवी ...
अन साम्राज्य निर्माण करायचे असेल
तर "शिवबाचच" काळीज हवं.......!

राजाधीराज छत्रपती शिवराय
दुर्गपती गजअश्वपती भूपती प्रजापती
सुवर्णरत्नंश्रीपती अष्टावधान जागृत
अष्टप्रधान वेष्टीत न्यायालंकार मंडीत
शस्त्रास्त्रशांस्त्र पारंगत राजनीती धुरंधर
पौढप्रताप पुरंदर क्षत्रीयकुलावतंस
सिँहासनाधीश्वर राजाधिराज महाराज
श्रीमंत श्री छत्रपती श्री शिवाजी महाराज कि जय...
छत्रपती शिवाजी महाराजच्या जयंतीच्या,
सर्व मित्र मैत्रिणीँना हार्दिक शुभेच्छा..

जागवल्याशिवाय जाग येत नाही
ओढल्याशिवाय काडी पेटत नाही तसे,
"छत्रपतींचे" नाव घेतल्याशिवाय
माझा दिवस उगवत नाही


--साधना पाल
-------------

               (साभार आणि सौजन्य-संदर्भ-अजब गजब जानकारी.कॉम)
              ---------------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-20.03.2022-रविवार.