II छत्रपति शिवाजी महाराज जयंती II-शुभकामनाएं क्रमांक-1

Started by Atul Kaviraje, March 20, 2022, 06:49:40 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                             II छत्रपति शिवाजी महाराज जयंती II
                                    शुभकामनाएं क्रमांक-1
                           -----------------------------------

मित्रो,

     कल दिनांक-२१.०३.२०२२-सोमवार, छत्रपती श्री शिवाजी महाराज की तिथीनुसार जयंती है. इस साल फाल्गुन वद्य तृतीया, 21 मार्च 2022 इस दिन है. महाराष्ट्रमे कई सण या उत्सव तिथीनुसार मनाने की परंपरा है. इस के अनुसार शिवजयंती भी इस तिथी पर बडे उत्साह से मनाई जाती है. कई शिवभक्त २१ मार्च को भी शिवजयंती बडे दिल से मनIते है. मराठी कविताके मेरे सभी हिंदी भाई-बहन कवी-कवयित्रीयोको इस सु-अवसर पर मेरी अनेक हार्दिक शुभेच्छाये .आईए इस सुनहरे दिवस पर पढते है--शुभकामनाएं, कविता, शायरी इत्यादी.

छ :- छत्तीस हत्तीचे बळ असणारे,
त्र :- त्रस्त मोगलांना करणारे,
प :- परत न फिरणारे,
ति :- तिन्ही जगात जाणणारे,
शि :- शिस्तप्रिय,
वा :- वाणिज तेज,
जी :- जीजाऊचे पुत्र,
म :- महाराष्ट्राची शान,
हा :- हार न मानणारे,
रा :- राज्याचे हितचिंतक,
ज :- जनतेचा राजा..

सिंहाची चाल,
गरुडा ची नजर,
स्रीयांचा आदर,
शत्रूचे मर्दन,
असेच असावे मवाळ्यांचे वर्तन,
हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण.....
जय शिवराय
जय शंभुराजे

"ओम" बोलल्याने मनाला शक्ती मिळते,
"साई" बोलल्याने मनाला शक्ती मिळते,
"राम" बोलल्याने पाप मुक्ती मिळते,
"जय शिवराय" बोलल्याने
आम्हाला शंभर वाघांची ताकद मिळते...

ना शिवशंकर... तो कैलाशपती
ना लंबोदर... तो गणपती
नतमस्तक तया चरणी
ज्याने केली स्वराज्य निर्मिती
देव माझा एकच तो
।। राजा शिवछत्रपती ।।

विजेसारखी तलवार चालवुन गेला,
निधड्या छातीने हिंदुस्थान हालवुन गेला,
वाघ नख्याने अफजलखानाचा कोथळा पाडुन गेला,
मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो सैतानांना नडुन गेला!
स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकुन मुजरा केला,
असा एक "मर्द मराठा शिवबा" होऊन गेला...

सुर्य नारायण जर उगवले नसते तर,
आकाशाचा रंगच समजला नसता..
जर छत्रपती शिवाजी राजे जन्मले नसते तर,
खरंच हिंदु धर्माचा अर्थच समजला नसता...
हे हिंदु प्रभो शिवाजी राजा तुला नमन असो!

शूरता हा माझा आत्मा आहे!
विचार आणि विवेक ही माझी ओळख आहे!
क्षत्रिय हा माझा धर्म आहे!
छत्रपती शिवराय हे माझे दैवत आहे!
होय मी मराठी आहे!
जय शिवराय!!


--AUTHOR UNKNOWN
-------------------------

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-पोएटरी विला.कॉम)
                  -------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-20.03.2022-रविवार.