II छत्रपति शिवाजी महाराज जयंती II-शुभकामनाएं क्रमांक-2

Started by Atul Kaviraje, March 20, 2022, 06:51:28 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                            II छत्रपति शिवाजी महाराज जयंती II
                                    शुभकामनाएं क्रमांक-2
                          -----------------------------------

मित्रो,

     कल दिनांक-२१.०३.२०२२-सोमवार, छत्रपती श्री शिवाजी महाराज की तिथीनुसार जयंती है. इस साल फाल्गुन वद्य तृतीया, 21 मार्च 2022 इस दिन है. महाराष्ट्रमे कई सण या उत्सव तिथीनुसार मनाने की परंपरा है. इस के अनुसार शिवजयंती भी इस तिथी पर बडे उत्साह से मनाई जाती है. कई शिवभक्त २१ मार्च को भी शिवजयंती बडे दिल से मनIते है. मराठी कविताके मेरे सभी हिंदी भाई-बहन कवी-कवयित्रीयोको इस सु-अवसर पर मेरी अनेक हार्दिक शुभेच्छाये .आईए इस सुनहरे दिवस पर पढते है--शुभकामनाएं, कविता, शायरी इत्यादी.

भगव्या झेंड्याची धमक बघ,
मराठ्याची आग आहे..
घाबरतोस काय कोणाला,
येड्या तू शिवबाचा वाघ आहे...
जय शिवाजी!

जिथे शिवभक्त उभे राहतात
तिथे बंद पडते भल्या भल्याची मती....!!
अरे मरणाची कुणाला भीती
आदर्श आमचे राजे शिव छत्रपती......!!
"!!! जय शिवराय !!!"

जागवल्याशिवाय जाग येत नाही.......
ओढल्याशिवाय काडी पेटत नाही........
तसे, "छत्रपतींचे" नाव घेतल्याशिवाय
माझा दिवस उगवत नाही...!!
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
|| जय शिवराय ||

झनझविला भगव्याच्या समान तुम्ही,
जागविले मरगळलेले मर्द मावळे तुम्ही,
घडविले श्रीं चे स्वराज्य तुम्ही,
ऐसे श्रीमंत योगी अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत,
श्री राजा शिवछञपती तुम्ही... !!

कोटी देवांची अब्जावधी मंदिरे असताना,?
पण एकही मंदिर नसताना
जे अब्जावधींच्या हृदयावर आधिराज्य करतात
त्यांना "छत्रपती" म्हणतात !

प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस् सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज
योगीराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय..!!

इतिहासाच्या पानावर आणि आमच्या
हृदयावर फक्त संभाजी राजाच नाव कोरलय..

मरण आले तरी चालील,
पण शरण जाणार नाही..

हवेत झेप घ्यायची असेल तर पक्षासारखं बळ हवं ...
दरीत झेप घ्यायची असेल तर आकाशाएवढं धाडस हवं...
पाण्यात उडी घ्यायची असेल तर माशा सारखी कला हवी ...
अन साम्राज्य निर्माण करायचे असेल
तर "शिवबाचच" काळीज हवं

पाठीवर शिवाजी आन
छाताडावर संभाजी कोरलाय..
अन जीवाचं नाव भंडारा ठेवलाय,
उधळला तरी येळकोट आन
नाय उधळला तरी बी येशुभेच्छा

शिवराय सांगायला सोपे आहेत,
शिवराय ऐकायला सोपे आहेत,
शिवरायांचा जयघोष करणे सुद्धा सोपे आहे,
पण शिवराय अंगीकारणे खुप कठीण आहे..
आणि जो शिवरायांना स्वतःच्या आचरणात आणेल,
तो या जगावर राज्य करेल एवढं मात्र नक्की!!
जय शिवराय! जय जिजाऊ!

सह्याद्रीच्या छाताडातून, नाद भवानी गाजे
काळजात राहती अमुच्या, रक्तात वाहती राजे !!
तुफ़ान गर्जतो, आग ओकतो,
वाघ मराठी माझा !
सन्मान राखतो, जान झोकतो
तुफानं मातीचा राजा !
"ताज महल अगर प्रेम की निशानी है "
तो "शिवनेरी किला" एक शेर की कहानी है..

अरे कापल्या जरी आमच्या नसा तरी,
उधळण होईल भगव्या रक्ताची,
आणि फाडली जरी आमची छाती,
तरी मूर्ती दिसेल फक्त शिवरायांची...
जय शिवराय!


--AUTHOR UNKNOWN
-------------------------

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-पोएटरी विला.कॉम)
                  -------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-20.03.2022-रविवार.