"STकर्मचाऱ्यांना वेतन-वाढीचे आमिषदाखविले,महिलांनीकाळ्याफिती लावून निषेधदर्शविले"

Started by Atul Kaviraje, March 22, 2022, 01:09:23 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

विषय :नांदेड  येथे  महिला  ST कर्मचाऱ्यांनी  वेतन -वाढीविरुद्ध  काळ्या  फिती  लावून  आंदोलन  केले .
            ST महिला  कर्मचारी  वेतन -वाढ  निषेध  आंदोलन  चारोळ्या
"ST कर्मचाऱ्यांना वेतन-वाढीचे आमिष दाखविले,महिलांनी काळ्या फिती लावून निषेध  दर्शविले"
--------------------------------------------------------------------------


(1)
शेवटी  अथक  प्रयत्नांनी  ST कर्मचाऱ्यांच्या  आंदोलनाला  फळ  मिळाले
सरकारने  त्यांच्या  मागण्या  मान्य  करून , त्यांना  हक्क  मिळवून  दिले
"पगार -वाढीला","वेतन -वाढीला" मंजुरी  देऊन , त्यांना  खुश  केले ,समाधानी  केले ,
इतिहासातले  त्यांचे  पहिले  अन  शेवटचे ,उरले -सुरले  आंदोलनही  संपले .

(2)
पण  सरकारचे  हे  "वेतन -वाढीचे"  गाजर  आमिष , त्यांच्या  आलंय  उशिरा  लक्षात
"पगार -वाढ"  मिळाली , पण  ST कर्मचाऱ्यांच्या  बाकीच्या  हक्कांचे  काय  ?
एवढ्यावरच  त्यांचे  कसं  भागेल  ? भविष्य  आहे  त्यांच्या  दृष्टी -टप्प्यात ,
इतर अधिकारही त्यांना मिळावयास  हवेत, तोपर्यंत राहील आंदोलन , मिळेपर्यंत न्याय  !

(3)
"महिला  ST कर्मचारी"  झाल्यात  अतिसक्रिय , या  नव्या  आंदोलनात
लक्षात  आलंय , सरकार  करतंय  फसवणूक , दुर्लक्ष  करीत  बाकीच्या  मागण्यांत
आज  त्याही  अग्रेसर  झाल्यात , "काळ्या  फिती"  लावून ,निषेधार्थ  सरकारच्या ,
त्याही  देताहेत  घोषणा  ST महामंडळाच्या  राज्य  सरकारमध्ये  "विलीनीकरणाच्या" .

(4)
होय , आता  आमचे  एकचं  लक्ष्य , आम्हा  हवंय  "विलीनीकरण"
तोवर  सुरूच  राहील  आमचे  हे  आंदोलन  असेच , सरकार  येईपर्यंत  शरण
काळा  दिन  साजरा  करण्या , आम्ही  लावल्यात  आज  "काळ्या  फिती" ,
मागण्या  आमच्या  मान्य  होईपर्यंत , आम्ही  पुन्हा  सुरु  करू  आमरण  उपोषण .

(5)
थोडक्यातच निभावतंय, सरकार  "वेतन -वाढ"  करून  त्यांच्या  तोंडाला  पानेच  पुसतंय
पण  न  कळण्याइतके  ते  नाहीत  दुधखुळे , त्यांना   सारं  काही  कळतंय
एकदाचा  संप  मिटवायचा , त्यांना  "वेतन -वाढीचे"  गाजर  दाखवायचे ,
आणि हे"विलीनीकरणाचे"खूळ,ST कर्मचाऱ्यांच्या डोक्यातून कायमचेच काढून टाकायचे .

(6)
पण  हे  अभंग ,एकजुटीचे  ST कर्मचाऱ्यांचे  विशाल ,मोठे  कुटुंब
आता  तर  महिलाही  देताहेत  पाठिंबा  पुरुषांना , देताहेत  सरकारला  ठाम  जबाब
त्या  म्हणताहेत , ST मंडळाचे  "विलीनीकरण"  करूनच  आम्ही  गप्प  राहू ,
स्त्री -शक्तीची  अफाट  ताकद , सरकारला  पुन्हा  एकदा  दाखवून  देऊ .


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-22.03.2022-मंगळवार.