मागणे

Started by शिवाजी सांगळे, March 23, 2022, 12:03:02 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

मागणे

एकच मागणे! तुज कडे आता
नको मोहमाया रे सोडून जाता

सारेच दान इथले तुझ्या कृपेचे
हक्क कशावर सांगू  मी आता

स्मृतींचा खेळ, भास भावनांचा
गुंतवशील कुठवर जीवा आता

क्षणिक सारे, पुरते तुलाच ठाव
कोण पुरेल कुणास होता होता

भान दे इथल्या सकल जनांना
परोपकार श्रेष्ठ..शाश्वत जगता

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९