"२७-मार्च–दिनविशेष"

Started by Atul Kaviraje, March 27, 2022, 12:09:42 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२७.०३.२०२२-रविवार. जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"


                                     "२७-मार्च–दिनविशेष"
                                    ---------------------

जागतिक रंगमंच दिवस
--------------------

अ) २७ मार्च रोजी झालेल्या घटना.
   ---------------------------

१६६७: शिवरायांना सोडुन गेलेल्या नेताजी पालकरचे औरंगजेबाने धर्मांतर केले व यांचे नाव महंमद कुली खान ठेवले.

१७९४: अमेरिकन नौदलाची स्थापना झाली.

१८५४: क्रिमियन युद्ध – इंग्लडने रशियाविरुद्ध युद्ध पुकारले.

१९५८: निकीता क्रुश्चेव्ह सोविएत रशियाचे अध्यक्ष झाले.

१९६६: २० मार्च रोजी चोरीला गेलेला फुटबॉलचा विश्वचषक दक्षिण लंडनमधील एका बागेत पिकल्स नावाच्या कुत्र्याला सापडला. त्यानंतर हा चषक १९८३ मधे पुन्हा चोरीला गेला, तो आजतागायत सापडलेला नाही.

१९७७: तेनेरिफ द्वीपावरील धावपट्टीवर पॅन अ‍ॅम आणि के. एल. एम. या दोन बोईंग ७४७ प्रकारच्या विमानांची टक्कर होऊन ५८३ जण ठार झाले.

१९९२: पंडित भीमसेन जोशी यांना मध्य प्रदेश सरकारचा तानसेन पुरस्कार प्रदान.

२०००: चित्रपट निर्माते व दिग्दर्शक बी. आर. चोप्रा यांना फाय फाउंडेशनतर्फे राष्ट्रभूषण पुरस्कार जाहीर.

=========================================

ब) २७ मार्च रोजी झालेले जन्म.
  -------------------------

१७८५: फ्रान्सचा राजा लुई (सतरावा) यांचा जन्म. (मृत्यू: ८ जून १७९५)

१८४५: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ विलहेम राँटजेन यांचा जन्म. (मृत्यू: १० फेब्रुवारी १९२३)

१८६३: रोल्स-रॉइस लिमिटेडचे निर्माते हेन्री रॉयस यांचा जन्म. (मृत्यू: २२ एप्रिल १९३३)

१९०१: डोनल्ड डकचे हास्यचित्रकार कार्ल बार्क्स यांचा जन्म. (मृत्यू: २५ ऑगस्ट २०००)

=========================================

क) २७ मार्च रोजी झालेले मृत्यू.
   -------------------------

१८९८: भारतीय शिक्षणतज्ञ, समाजसुधारक आणि तत्त्ववेत्ते सर सय्यद अहमद खान यांचे निधन. (जन्म: १७ ऑक्टोबर १८१७)

१९५२: टोयोटा मोटर कंपनीचे संस्थापक काइचिरो टोयोटा यांचे निधन. (जन्म: ११ जून १८९४)

१९६७: नोबेल पारितोषिक विजेते झेक रसायनशास्त्रज्ञ जेरोस्लॉव्ह हेरॉव्हस्की यांचे निधन. (जन्म: २० डिसेंबर १८९०)

१९६८: पृथ्वीप्रदक्षिणा करणारे पहिले अंतराळवीर युरी गागारीन यांचे निधन. (जन्म: ९ मार्च १९३४)

१९९२: साहित्यिक, गरवारे वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. शरच्‍चंद्र वासुदेव चिरमुले यांचे निधन.

१९९७: संगीत नाटकातील अभिनेते व गायक भार्गवराम आचरेकर यांचे निधन.

२०००: हिंदी चित्रपट अभिनेत्री वेरा सुंदर सिंग तथा प्रिया राजवंश यांची चेतन आनंद यांच्या मुंबईतील रुईया पार्क येथील बंगल्यात हत्या करण्यात आली.

=========================================


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-27.03.2022-रविवार.