सांग सख्ये कसं करू कौतुक तुझं.........

Started by अतुल देखणे, June 14, 2010, 01:10:54 PM

Previous topic - Next topic

अतुल देखणे

                           सांग सख्ये कसं करू कौतुक तुझं.........


सांग सख्ये कसं करू कौतुक तुझं, ही अशी कवीता असताना,
अशीच आहेस तू , तशीच आहेस तू , कसं लीहू समोर तू नसताना ....

आठवतो तेव्हा तुला.... रमणीय काव्य लीहीताना ,
पाहतो तेव्हा तुला....रीमजीम पाऊस झेलताना
मन माझं आतुर असतं वाट तुझी पाहताना ,
नेमकी तू येत नाहीस अशीच वेळ असताना ...
सांग सख्ये कसं करू कौतुक तुझं,  ही अशी कवीता असताना......

सांगायचं आहे मला तृप्त तुझ्या या ओठांना ,
जाणायच आहे मला गुप्त तुझ्या या हृदयाला
फुगवलेल्या या गालांना गोड गुलाबी हसताना ,
पाहायचं आहे मला तू माझ्या सोबत असताना ....
सांग सख्ये कसं करू कौतुक तुझं, ही अशी कवीता असताना.......

जाणशील तूच एक दीवस... पाहशील सुद्धा तूच एक दीवस ....
प्रेमाची ही रीमजीम वर्षा एक अतुल-नीय कृत्य करताना.......आणी ,
सांग सख्ये कसं करू कौतुक तुझं, ही अशी कवीता असताना,
अशीच आहेस तू , तशीच आहेस तू , कसं लीहू समोर तू नसताना ....


---- अतुल देखणे ----


gaurig


अतुल देखणे

धन्यवाद  मित्रांनो , मराठी हृदय आपलं आभारी आहे........

PRASAD NADKARNI




अतुल देखणे

धन्यवाद , मराठी हृदय आपलं आभारी आहे..