विनोदी चारोळ्या-कारागृहात लावलेत सी.सी.टी.व्ही.कॅमेरे,सैल झालेत जेलमधील पहारे

Started by Atul Kaviraje, April 11, 2022, 04:12:07 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                  विषय : कारागृहात सी.सी.टी.व्ही. कॅमेरे
                           विनोदी वास्तव चारोळ्या
   "कारागृहात लावलेत सी.सी.टी.व्ही.कॅमेरे,सैल झालेत जेलमधील पहारे!"
                                 (भाग-2)
  ---------------------------------------------------------------


(६)
सुटकेनंतरही कैद्यांना घरी चैन नाहीय
"CCTV कॅमेऱ्याची" सवयच झालीय
"जेलचा"  FEEL यावा म्हणून सारी खोली,
त्यांनी महागड्या फिरत्या "CCTV कॅमेऱ्यांनी" सजवलीय.

(७)
पलायनाचे सारेच मार्ग खुंटलेत
यापूर्वी कैदी कितीतरी वेळा पळालेत
आधुनिक विज्ञानाची आधुनिक करामत पाहून,
"CCTV कॅमेऱ्यांपुढे" त्यांनी अक्षरशः हात टेकलेत. 

(८)
पोलीस भरती "जेलमध्ये" खंडित झालीय
नोकरीवर असलेल्याना चक्क BREAK मिळालाय
"CCTV कॅमेऱ्याने" आपल्या खास अंदाजाने,
अख्ख्या "जेलचा" कार्यभाग सांभाळलाय.

(९)
पोलिसांची संख्या कमी होऊन
COMPUTER OPERATER-ची संख्या वाढत चाललीय
"CCTV" OPERATE करण्यासाठी चक्क,
"जेलमध्ये", COMPUTER ROOM-ही बांधण्यात आलीय.

(१०)
"जेल", आज "जेल" वाटतच नाही
त्याचे सारे रूपच पालटून गेलंय
आधुनिक सुख-सुविधांनी सुसज्ज असे ते,
"पंच तारा-(कारा ?)गृहच" वाटू लागलंय.



-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-11.04.2022-सोमवार.