मार्मिक चारोळ्या-वधू हळदीत मढलीय हळदीने, चोरांच्या मनात भरलेत दागिने

Started by Atul Kaviraje, April 12, 2022, 05:30:14 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                    विषय : हळदी समारंभात दागिने चोरी
                            मार्मिक विनोदी चारोळ्या
        "वधू हळदीत मढलीय हळदीने, चोरांच्या मनात भरलेत दागिने !"
                                  (भाग-2)
      ----------------------------------------------------------


(६)
पोलिसांना आज खास आमंत्रण होते
पोलीस-कन्येचा "हळदीचा" कार्यक्रम सुरु होता
समारंभात येणाऱ्या प्रत्येक आमंत्रितांवर,
पोलीस-पथकाचा करडा वौच होता.

(७)
"चोराची" बायको "दागिन्यांनी" मढली होती
पिवळ्या-धमक आभेने नुसती पिवळी पडली होती
तिथे "हळदीच्या" कार्यक्रमात "वधूला हळद" लागून,
"वधू" फक्त "हळदीनेच" पिवळी पडली होती.

(८)
आजकाल "हळदी" समारंभ होत नाहीत
झट मागणी पट ब्याहचेच दिवस आलेत
"चोरांचे" फक्त "हळदीतच चोरी" करायचे उसूल,
आज त्यांच्याच अंगलटिस आलेत,

(९)
हाताला चांगलेच घबाड सापडले होते
"चोराचा" आनंद गगनात मावत नव्हता
पण, पाणी चढवलेले "दागिने" त्याला समजताच,
त्याचा चेहराच पिवळा पडला होता.

(१०)
सोने, "चोराला" वाकुल्या दाखवत होते
हात लागताच अलार्म वाजत होता
बंदिस्त पेटीचा, हाताला झटका बसून,
"चोराचे", "चोरीचे" पितळ उघडे पडत होते.


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-12.04.2022-मंगळवार.