विनोदी मार्मिक चारोळ्या-डाव मेट्रोत रंगला जुगाराचा,तीन पत्तीचा अन मेंदीकोटचा

Started by Atul Kaviraje, April 14, 2022, 08:15:23 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                          विषय : मेट्रोत जुगाराचा डाव
                            विनोदी मार्मिक चारोळ्या
          "डाव मेट्रोत रंगला जुगाराचा,तीन पत्तीचा अन मेंदीकोटचा"
                                   (भाग-3)
        ----------------------------------------------------


(११)
इतकी सवय झालीय "पत्त्यांची"
त्याशिवाय शांत झोपत नाहीय
निवृत्तीनंतरही घरी "रेल्वे" डबा चितारून,
"रेल्वेच्या SEAT"-चीही  ARRANGEMENT केलीय.

(१२)
माझे सवंगडीही माझ्यासारखेच खेळाडू
कुशल, विशारद, निपुण, "पत्तेपटू"
गाडीला जराही उशीर होताच,
PLATFORM-वरच ते लागतात कुटू. 

(१३)
माझे जीवन "पत्त्यातच" रमले
अख्खे आयुष्य गाडीतच गेले
जशी गाडी माझ्या जिवा-भावाची,
"पत्ते"-माझी जोडी जणू, जिवा-शिवाची. 

(१४)
"रेल्वे" कामगारांच्या मागण्या होत्या
आज "रेल्वेचा" संप होता
"पत्ते" पिसण्यास माझा हात,
सवयीने नुसता शिवशिवत होता.

(१५)
"जुगार" केलाय सरकारने गार
सोमवार असो  वा मंगळवार  !
खिशातली  राणी  मला हसत असते,
नकळत मी तिचा गुलाम होत असतो.


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.04.2022-गुरुवार.