१५-एप्रिल–दिनविशेष

Started by Atul Kaviraje, April 15, 2022, 07:09:30 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१५.०४.२०२२-शुक्रवार.जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"


                                      "१५-एप्रिल–दिनविशेष"
                                     ---------------------


अ) १५ एप्रिल रोजी झालेल्या घटना.
   ----------------------------

१६७३: मराठा साम्राज्याचे सरनौबत प्रतापराव गुजर यांनी बहलोलखान पठाणाविरुद्ध मोठी लढाई जिंकली.

१८९२: जनरल इलेक्ट्रिक कंपनीची स्थापना झाली.

१९१२: आर. एम. एस. टायटॅनिक हे जहाज उत्तर अटलांटिक महासागरात बुडाले.

१९२३: मधुमेह असणा-यांना इन्सूलिन वापरण्यासाठी सामान्यतः उपलब्ध झाले.

१९४०: दुसरे महयुद्ध – नाझी जर्मनीच्या ताब्यात असलेल्या नॉर्वेतील नॉर्विक शहरावर दोस्त राष्ट्रांच्या फौजांनी हल्ला सुरू केला.

१९९७: मक्‍केपासून सहा किमी अंतरावरील मिना (सौदी अरेबिया) येथे हज यात्रेकरुंच्या तंबूला आग लागून किमान ३०० जण मृत्युमुखी पडले.

=========================================

ब) १५ एप्रिल रोजी झालेले जन्म.
  --------------------------

१४५२: इटालियन चित्रकार, संशोधक, गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ लिओनार्डो डा विंची यांचा जन्म. (मृत्यू: २ मे १५१९)

१४६९: शिख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरू गुरू नानक देव यांचा जन्म. (मृत्यू: २२ सप्टेंबर १५३९)

१७०७: स्विस गणितज्ञ लिओनार्ड ऑयलर यांचा जन्म. (मृत्यू: १८ सप्टेंबर १७८३)

१७४१: चित्रकार, निसर्गवैज्ञानिक व सैनिक चार्ल्स विल्सन पील अमेरिकन यांचा जन्म. (मृत्यू: २२ फेब्रुवारी १८२७)

१८९३: चरित्रकार, टीकाकार, इतिहास संशोधक, संत साहित्याचे अभ्यासक व लेखक नरहर रघुनाथ तथा न. र. फाटक यांचा जन्म. (मृत्यू: २१ डिसेंबर १९७९)

१८९४: सोविएत युनियनचे राष्ट्राध्यक्ष निकिता क्रूश्चेव्ह यांचा जन्म. (मृत्यू: ११ सप्टेंबर १९७१)

१९०१: अजय मुखर्जी भारतीय राजकारणी यांचा जन्म.

१९१२: उद्योजक व वेदाभ्यासक मल्हार सदाशिव तथा बाबूराव पारखे यांचा जन्म. (मृत्यू: १३ जानेवारी १९९७)

१९१२: उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम सुंग (दुसरे) यांचा जन्म. (मृत्यू: ८ जुलै १९९४)

१९२२: गीतकार हसरत जयपुरी यांचा जन्म. (मृत्यू: १७ सप्टेंबर १९९९)

१९३२: कवी सुरेश भट यांचा जन्म. (मृत्यू: १४ मार्च २००३)

१९६३: भारतीय क्रिकेटपटू मनोज प्रभाकर यांचा जन्म.

=========================================

क) १५ एप्रिल रोजी झालेले मृत्यू.
   --------------------------

१७९४: पंडीतकवी मोरेश्वर रामचंद्र पराडकर उर्फ मोरोपंत यांचे निधन.

१८६५: अमेरिकेचे १६ वे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांची जॉन बूथ याने हत्या केली. (जन्म: १२ फेब्रुवारी १८०९)

१९१२: आर. एम. एस. टायटॅनिक जहाजाचे कप्तान एडवर्ड जे. स्मिथ यांचे निधन. (जन्म: २७ जानेवारी १८५०)

१९१२: आर. एम. एस. टायटॅनिक जहाजाचे रचनाकार थॉमस अॅन्ड्रयूज यांचे निधन. (जन्म: ७ फेब्रुवारी १८७३)

१९८०: फ्रेन्च लेखक, कवी, तत्त्वज्ञ आणि नोबेल पारितोषिक विजेते जेआँ-पॉल सार्त्र यांचे निधन. (जन्म: २१ जून १९०५)

१९९०: हॉलिवूड अभिनेत्री ग्रेटा लोविसा गुस्ताव्हसन ऊर्फ ग्रेटा गार्बो यांचे निधन. (जन्म: १८ सप्टेंबर १९०५)

१९९५: तत्कालीन मध्यभारत राज्याचे पहिले मुख्यमंत्री पंडित लीलाधर जोशी यांचे निधन.

१९९८: कंबोडियातील २० लाख नागरिकांच्या हत्याकांडास जबाबदार असणारा ख्मेर रुजचा नेता पॉल पॉट यांचे निधन. (जन्म: १९ मे १९२५)

२०१३: संत साहित्याचे अभ्यासक वि. रा. करंदीकर यांचे निधन. (जन्म: २७ ऑगस्ट १९१९)

=========================================


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-15.04.2022-शुक्रवार.