मार्मिक विनोदी चारोळ्या-निदर्शन चाललंय महिलांचे मूक, यात कुठेतरी दिसतेय चूक

Started by Atul Kaviraje, April 15, 2022, 07:19:49 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                       विषय : महिलांची मूक निदर्शने
                       मार्मिक विनोदी महिला चारोळ्या
      " निदर्शन चाललंय महिलांचे मूक, यात कुठेतरी दिसतेय चूक ! "
                                  (भाग-2)
    ----------------------------------------------------------


(६)
एरव्ही रस्ता असायचा गजबजलेला, शब्दांनी भरलेला
उत्स्फूर्ततेने, तावातावाने, हातवाऱ्याने, भांडणाने ,वचवचलेला
निरव शांतता पसरलीय, रस्ताही नवलाने ऐकतोय,
शिस्तबद्ध असा "अबोल  महिलांचा", "मूक" मोर्चा चालतोय.

(७)
मुलगी विचारतेय, आई आज शांत कशी ?
मला ओरडत नाहीय ती नेहमीसारखी !
तिला काय ठाऊक,यापाठचे खरे कारण ,
बायको झालीय आज "मुकी," झाले होते तिचे "शब्द-हरण" !
   
(८)
हातात फलक घेऊन उभ्या होत्या "बायका"
मागण्या मान्य करा, आतातरी आमचे ऐका !
नाही ऐकलंत तर, परिणामांस व्हा तयार,
घणाघाती "शब्दांनी" करू तुम्हांवर आम्ही प्रहार !

(९)
"बायकांची" सहनशक्ती आज श्रेष्ठ ठरत होती
सोशिकता हा बहुतेक त्यांचा  निसर्ग-दत्त गुणच असावा
एरव्ही सकाळ भांडणाने, रात्र कांडणाने करणाऱ्या "बायका,"
दृढ-निश्चयी दिसत होत्या,साऱ्या दुनियेने हा क्षण अनुभवावा !

(१०)
चाळीमध्ये संपूर्ण शांतता पसरली होती
चाळीच्या नळावरची  भांडणे थांबली होती
जास्तीत जास्त वेळ "मौन" धरणाऱ्या "बाईस,"
एक करोडची लौटरी जाहीर झाली होती.


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-15.04.2022-शुक्रवार.