चारोळ्या-बंदूकधारी महिला रस्तोरस्ती फिरती, पुरुषांनी पत्करलीय त्यांजपुढे शरणागती

Started by Atul Kaviraje, April 16, 2022, 01:49:18 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                    विषय : सरकारने महिलांना बंदुका परवाने दिले
                             वास्तव मार्मिक विनोदी चारोळ्या
    " बंदूकधारी महिला रस्तोरस्ती फिरती, पुरुषांनी पत्करलीय त्यांजपुढे शरणागती !"
                                        (भाग-2)
  -----------------------------------------------------------------------


(६)
"बायकोचा" नेम आजवर कधीच चुकला नव्हता
लाटणे फेकून मारण्याचा त्यांना सराव होता
"सरकारने" अश्या "महिलांचा" शोध घेऊन,
त्यांना चक्क आर्मीत प्रवेश दिला होता.

(७)
पुरुष डॉन तसबिरी भिंतीवर लटकताहेत
गुंड-पुंड त्यांना श्रद्दांजली वाहताहेत
लयास गेलंय राज्य, नामशेष झालंय गुंडा-राज,
"लेडी डॉन" मिरवू लागल्यात, "लेऊन" बंदुकांचा साज.

(८)
"बायको", मुलीला बंदुकीचे शिक्षण देत होती
मुलगी, "बायकोच्या" पावलांवर पाऊल ठेवीत होती
घर कमी, युद्ध-मैदानच जणू भासत होते,
"परवाने" देऊन "सरकारने" घर-पणच  हिरावले होते.

(९)
"स्त्री" जगावर सत्ता गाजवू लागली होती
तिच्या हाती आज सारी सूत्रे आली होती
"बंदुकीच्या" जोरावर तिने स्वराज्य स्थापिले होते,
"रण-चंडिका", "रण-मर्दानी" म्हणून नाव कोरले होते.

(१०)
शस्त्रसाठा संपुष्टात आला होता, संरक्षण खात्याचा
घरोघरी, प्रत्येक भिंतींवर "बंदुका" लटकत होत्या
"सरकारने" "बंदुका परवाने" देऊन "महिलांना",
रात्रंदिन युद्धाचा प्रसंग सुरु केला होता.


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-16.04.2022-शनिवार.