१७-एप्रिल–दिनविशेष

Started by Atul Kaviraje, April 17, 2022, 03:51:33 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१७.०४.२०२२-रविवार. जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"


                                     "१७-एप्रिल–दिनविशेष"
                                    ---------------------


अ) १७ एप्रिल रोजी झालेल्या घटना.
   ----------------------------

१९४१: दुसरे महायुद्ध – युगोस्लाव्हियाने जर्मनीसमोर शरणागती पत्करली.

१९४६: सिरियाने फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळवले.

१९५०: बॅ. मुकुंदराव जयकर पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू झाले.

१९५२: पहिली लोकसभा अस्तित्वात आली.

१९७१: द पीपल्स रिपब्लिक ऑफ बांग्लादेशची स्थापना झाली.

१९७५: ख्मेर रुजने कंबोडियाची राजधानी नॉम पेन्ह जिंकली.

२००१: अफवांच्या अर्थशास्त्राचा सिद्धांत मांडणारे मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नालॉजीमधील अर्थशास्त्रज्ञ प्रा. अभिजित बॅनर्जी यांना पहिला माल्कम – आदिशेषय्या पुरस्कार जाहीर करण्यात आला.

=========================================

ब) १७ एप्रिल रोजी झालेले जन्म.
   -------------------------

१४७८: हिंदी कवी, थोर कृष्णभक्त व कीर्तनभक्तीचे आचार्य संत सूरदास यांचा जन्म.

१८२०: बेसबॉल चे जनक अलेक्झांडर कार्टराईट यांचा जन्म. (मृत्यू: १२ जुलै १८९२)

१८३७: अमेरिकन सावकार जे. पी. मॉर्गन यांचा जन्म. (मृत्यू: ३१ मार्च १९१३)

१८९१: कोशकार यशवंत रामकृष्ण दाते यांचा जन्म. (मृत्यू: २१ मार्च १९७३)

१८९७: अद्वैत तत्त्वज्ञानी निसर्गदत्त महाराज यांचा जन्म. (मृत्यू: ८ सप्टेंबर १९८१)

१९१६: जगातील पहिल्या महिला तर श्रीलंकेच्या ६ व्या पंतप्रधान सिरिमाओ बंदरनायके यांचा जन्म. (मृत्यू: १० ऑक्टोबर २०००)

१९५१: चित्रपट अभिनेत्री बिंदू यांचा जन्म.

१९६१: बिलियर्डसपटू गीतसेठी यांचा जन्म.

१९७२: श्रीलंकेचा क्रिकेटपटू मुथय्या मुरलीधरन यांचा जन्म.

१९७७: भारतीय क्रिकेटपटू दिनेश मोंगिया यांचा जन्म.

=========================================

क) १७ एप्रिल रोजी झालेले मृत्यू.
   -------------------------

१७९०: अमेरिकन संशोधक आणि मुत्सद्दी बेंजामिन फ्रँकलिन यांचे निधन. (जन्म: १७ जानेवारी १७०६)

१८८२: फ्लश टॉयलेट चे शोधक जॉर्ज जेनिंग्स यांचे निधन. (जन्म: १० नोव्हेंबर १८१०)

१९४६: भारत सेवक समाजाचे अध्यक्ष व्ही. एस. श्रीनिवासशास्त्री यांचे निधन. (जन्म: २२ सप्टेंबर १८६९)

१९७५: भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे निधन. (जन्म: ५ सप्टेंबर १८८८)

१९९७: ओरिसाचे मुख्यमंत्री, केन्द्रीय पोलाद, खाणकाम आणि कोळसा मंत्री बिजू पटनायक यांचे निधन. (जन्म: ५ मार्च १९१६)

१९९८: चित्रपट निर्माते विजय सिप्पी यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू.

२००१: वनस्पतिशास्त्रज्ञ तसेच देवराई अभ्यासक डॉ. वा. द. वर्तक यांचे निधन. (जन्म: १९ ऑक्टोबर १९२५)

२००४: कन्नड, तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि हिंदी चित्रपट अभिनेत्री सौंदर्या यांचे निधन. (जन्म: १८ जुलै १९७२)

२०११: विनोदी साहित्यिक वि.आ. बुवा यांचे निधन. (जन्म: ४ जुलै १९२६)

२०१२: भारतीय पत्रकार आणि राजकारणी नित्यानंद महापात्रा यांचे निधन. (जन्म: १७ जुन १९१२)

=========================================


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-17.04.2022-रविवार.