चारोळ्या-कवडीमोल भाव मिळतोय फळभाज्यांना,रस्त्यावर फेकलंय टोमॅटो,ढोबळी मिरच्यांना

Started by Atul Kaviraje, April 17, 2022, 04:00:07 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                 विषय : ट्रक भरभरून फळभाज्या ओतल्या रस्त्यावर
                           वास्तव गंभीर व्यंगात्मक चारोळ्या
"कवडीमोल भाव मिळतोय फळभाज्यांना,रस्त्यावर फेकलंय टोमॅटो,ढोबळी मिरच्यांना"
                                      (भाग-3)
--------------------------------------------------------------------------


(११)
"टोमॅटो", "भोपळी मिरच्यांचे" विस्मरणच झालंय
केव्हातरी ते गाजवीत होते शेत-मैदान
शेतकऱ्यांनी त्यांचे पीक घेणे बंद केलंय,
बियाणांचे केलंय त्यांनी क्रिया-कर्म-दान.

(१२)
MENU-CARD "टोमॅटो,मिरच्यांच्या" पदार्थानी भरलंय
विविध खमंग पदार्थानी TABLE पहा सजलंय
HOTELS गब्बर होत चाललीत खाण्या -पिण्याची,
कवडीमोल "भावाने" विकत घेऊन "टोमॅटो" अन "ढोबळी-मिरची".

(१३)
ट्रकांना भरभरून मागण्या येत आहेत
TRUCK कंपन्यांचा PICK-UP वाढला आहे
शेत ते "रस्ता" एवढ्याच मारताहेत ते फेऱ्या,
भरमसाट वाढल्या आहेत आज-काल त्यांच्या वाऱ्या.

(१४)
शेतकऱ्याने शेती करणे सोडून दिलंय
फायदा काय ? वरून नांगरच फिरवायचा ना शेवटी !
मेहनत, काबाडकष्ट, श्रमांना  त्यांने  तिलांजली दिली,
ऐषो-आरामाची, बसण्याची त्याने आता नोकरी धरली.

(१५)
ओतलेल्या "फळभाज्यांनी" रस्ता बहरलाय
"टोमॅटो, ढोबळ्यांचा" नुसता चिखल झालायं
आपल्याच हस्ते झालेले नुकसान पाहून,
शेतकरी-दादाचा कंठ दाटून आलाय.


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-17.04.2022-रविवार.