वास्तव मार्मिक चारोळ्या-दगडाला दुधाचा अभिषेक केला, त्यात आम्ही देव पाहीला

Started by Atul Kaviraje, April 18, 2022, 11:06:15 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

             विषय : दगडाला दुधाचा अभिषेक करून आंदोलन
                       वास्तव मार्मिक आंदोलन चारोळ्या
         "दगडाला दुधाचा अभिषेक केला, त्यात आम्ही देव पाहीला !"
                                    (भाग-3)
       ------------------------------------------------------


(११)
एकमेकांवरली "दगड"-फेक इतिहासजमा झाली होती
घराच्या काचांनी सुटकेचा निश्वास सोडला होता
देवासमान "दगड" धावून आला होता,
आज त्या "दगडाचाच" देव झाला होता.

(१२)
"दगड"-पूजन हे गावोगावी-खेडोखेडी होतंच असते
हे काही आज, आता घडत नव्हते
फरक इतकाच तेव्हा तो गावाच्या वेशीवर होता,
आज सन्मानाने शहरी प्रतिष्ठापित होत होता.

(१३)
काळ्या "दगडावरची" रेघ होती ही
केव्हातरीचे भाकीत खरे ठरत होते
फरक, रेघे-ऐवजी "दूध" होते "दगडावर",
आंदोलनकारीचे हेच एकमेव "दुधाळ"-अस्त्र होते.

(१४)
गुरुजींचे पाय जमिनीवर ठरत नव्हते
जीकडून-तिकडून त्यांना पाचारण होत होते
आज इथे पूजा, तर उद्या तिथे अभिषेक,
या "दगडाने" त्यांचे भविष्यच घडविले होते.

(१५)
बथ्थड  कुठला, "दगड" भरलेत नुसते डोक्यात !
वाक्प्रचार आज लयीस  गेला होता
जेव्हापासून पूजला जाऊ लागला "दगडही",
मठ्ठ, मूर्खही मनोमन सुखावला होता.


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-18.04.2022-सोमवार.