मार्मिक चारोळ्या- अंगावर सोन्याचे वजन वाढलंय, सोन्याने माझं वजनच वाढवलंय

Started by Atul Kaviraje, April 19, 2022, 11:24:11 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                    विषय : सोन्याने मढलेली आजची तरुणाई
                        वास्तव मार्मिक व्यंगात्मक चारोळ्या
       "अंगावर सोन्याचे वजन वाढलंय, सोन्याने माझं वजनच वाढवलंय !"
                                    (भाग-3)
     -----------------------------------------------------------


(११)
"सुवर्ण"-मयी परंपरा जतत तरुणाई
आई-वडिलांचे "सुवर्ण"-आशिष घेत होती
अन बाल-"सुवर्ण" दागिने मुलांना चढवून,
आपले संस्कार जपत होती.

(१२)
सोनाराने कान टोचणे बंद केलयं
जड "सुवर्णालंकार" तो घडवू लागलाय
तरुणाईचे आवडते दागिने बनवून,
पहा कसा तो मालामाल झालाय.

(१३)
मुंबईची दुबई होऊ पहात आहे
"सोन्याची" पहाट उदयास येत आहे
"सोन्याने" लगडलेली, लडबडलेली आजची तरुणाई,
उगवत्या सूर्यास "सोनेरी"-अर्घ्य अर्पित आहे.

(१४)
कुबेरही नतमस्तक झालाय तरुणाईपुढे
विचार करू लागलाय तो स्वतःशीच
माझे धनही पहा पडलंय कमी,
या  "GOLDEN" BOY अन  "GOLDEN" GIRL च्या, श्रीमंतीपुढे !

(१५)
इतिहासात होते पIहिले राजे-रजवाडे 
भरजरी कपडे अन दागिने घातलेले
पुन्हा राम-राज्यच जणू अवतरलय भूवरी,
पुनरावृत्ती होतेय इतिहासाची, तरुणाई-रूपे. 


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.04.2022-मंगळवार.