मजेदार श्रीमंत चारोळ्या-घोळ मासा जाल्यामंदी गावला,आज आम्हाला कुबेरच पावला

Started by Atul Kaviraje, April 20, 2022, 11:46:03 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     दिनांक-०१.०९.२०२१,बुधवार रोजी, बीबीसी न्युज मराठी या यु - ट्यूब चॅनेल वर एक व्हिडीओ दाखविण्यात आला होता, की  पालघर येथील कोळी बांधवाना, खोल समुद्रात मासेमारी करताना चक्क, बहुमूल्य असे घोळ मासे त्यांच्या जाळ्यात अडकले होते. अत्यंत बहुमूल्य, बहुमोली, औषधी तत्त्वांनी, आणि गुणधर्मानी युक्त अश्या या घोळ माश्याना देशभरात, व परदेशातही मागणी असते. त्यासाठी व्यापारी हे कितीही बोली लावण्यासाठी तयार असतात.

          तर सांगायचा  मुद्दा हा की , कोळी बांधवांच्या जाळ्यात एकूण १५७ घोळ मासे सापडले होते, व त्यांची बाजारात एकूण किंमत  ही अंदाजे १ कोटी तेहेत्तीस लाख (रुपये-१,३३,००,०००/-) इतकी आहे. म्हणजे एका  घोळ माशाची किंमत ही रुपये-८४,७१३/- इतकी मोजली गेली आहे. सांगायला नको, की कोळी बांधवाना ही जणू लौटरीच लागली आहे. असो, ऐकुया, काही मजेदार, वास्तव, या घोळ माशाप्रमाणेच श्रीमंत  चारोळ्या.


                        विषय : जाल्यात गावले घोल (घोळ) मासे
                             मजेदार, वास्तव, श्रीमंत चारोळ्या
             "घोळ मासा जाल्यामंदी गावला,आज आम्हाला कुबेरच पावला"
                                         (भाग-3)
           --------------------------------------------------------


(११)
उत्साह शिगेला पोहोचला होता
"कोळीवाडा' पताकांनी सजला होता
"घोळ"-सण साजरा होत होता,
दूर-दूरवर वार्ता-नाद घुमत होता.

(१२)
आज समुद्र नवसाला पावलाय
दुर्मिळ-दान "कोळ्याच्या" जाळ्यात गावलय
वर्षानुवर्षे ज्याची होती प्रतीक्षा,
एका सेकंदात, समुद्र-धनाचा वर्षाव झालाय.

(१३)
समुद्राच्या पोटी लपलाय खजिना
साहसाची संधी दवडू नये
कोणी सांगावं अपुली झोळी,
मौल्यवान "घोळीनी" परिपूर्ण भरावी.

(१४)
आयुष्यभर नोकरी करीत राहिलो
मासिक कमाई संपवीत राहिलो
देवाकडे मागणे, "घोळ"-रुपी अक्षयदान,
अन पुढील जन्म, "कोळियाच्या" रुपानं !

(१५)
एक पी जे चारोळी--
     मजेत वल्हवतोय सागरी होडी
     "घोळ"-जोडी मारी उंचाडी उडी
     विचारिती, तुला व्हायचेय श्रीमंत ?
     पकडून दाखव, थांबव पकडा-पकडी !


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-20.04.2022-बुधवार.