गंभीर वास्तव चारोळ्या-बा तरुणा, ओढ ? (सोड) ती सिगारेट

Started by Atul Kaviraje, April 21, 2022, 11:46:08 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

               विषय : तरुणाई जात चाललीय सिगारेटच्या आहारी
                                गंभीर वास्तव चारोळ्या
                     "बा तरुणा, ओढ ? (सोड) ती सिगारेट !"
                                     (भाग-2)
            ------------------------------------------------


(६)
"बा तरुणा" , झुरक्यावर झुरके घेऊन
तू  तुझ्या श्रीमंतीचे प्रदर्शन का करणार ?
की पैसा संपता संपत नाही म्हणून,
तू असा घातकी, अविचारी मार्ग अवलंबणार ?

(७)
"बा तरुणा", ही काही चैन नव्हे
तुझ्यापुढे आयुष्य पडलंय सारे नवे
नवनवीन आव्हाने अंगावर घेणार, की,
वलयांकित धुरात स्वतःला हरवून बसणार ?

(८)
तरुणाई का धाव घेत सुटलीय ?
पाश्चिमात्यांचा  मार्ग चोखाळू लागलीय
आपली नव्हे ही वाह्यात कृती,
जोपासावी यापुढेही कायमचीच संस्कृती !

(९)
'सिगारेट" कंपन्या झाल्यात गब्बर
विकून अख्खेच्या अख्खे पाकीट
पण पिणाऱ्यास नाही कळत कधी,
हळू हळू काढतोय आपण वरचे तिकीट !

(१०)
म्हणून म्हणतोय, "बा तरुणा, सोड ती सिगारेट" !
आज तुझा बाजारात काहीच नाहीय रेट
स्वतःला घडव, काहीतरी दाखव करून,
तरच या भव -सागरात जाशील तू तरून !


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-21.04.2022-गुरुवार.