२३-एप्रिल–दिनविशेष

Started by Atul Kaviraje, April 23, 2022, 07:48:24 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२३.०४.२०२२-शनिवार. जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"


                                      "२३-एप्रिल–दिनविशेष"
                                     ----------------------


अ) २३ एप्रिल रोजी झालेल्या घटना.
   ----------------------------

१६३५: अमेरिकेतील पहिली सार्वजनिक शाळा बोस्टन लॅटिन स्कूल स्थापन झाली.

१८१८: इंग्रज अधिकारी मेजर हॉल यास कर्नल प्रॉयर याने रायगड किल्ल्याची टेहळणी करण्यास पाठवले.

१९९०: नामिबियाचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.

१९९५: जागतिक पुस्तक दिन पहिल्यांदा साजरा करण्यात आला.

२००५: मी अॅट द झू  हा पहिला व्हिडिओ युट्यूब वर प्रकाशित झाला.

=========================================

ब) २३ एप्रिल रोजी झालेले जन्म.
  --------------------------

१५६४: इंग्लिश नाटककार, लेखक आणि अभिनेते विल्यम शेक्सपियर यांचा जन्म. (निधन: २३ एप्रिल  १६१६)

१७९१: अमेरिकेचे १५ वे राष्ट्राध्यक्ष जेम्स बुकॅनन यांचा जन्म. (मृत्यू: १ जून १८६८)

१८५८: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिक शास्त्रज्ञ मॅक्स प्लँक यांचा जन्म. (मृत्यू: ४ ऑक्टोबर १९४७)

१८५८: समाजसुधारक पंडिता रमाबाई सरस्वती यांचा जन्म. (मृत्यू: ५ एप्रिल १९२२)

१८७३: अस्पृश्यता निवारण हे जीवनध्येय मानलेले व्यासंगी समाजसुधारक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म. (मृत्यू: २ जानेवारी १९४४)

१८९७: नोबेल पारितोषिक विजेते कॅनडाचे १४ वे पंतप्रधान लेस्टर बी. पिअर्सन यांचा जन्म. (मृत्यू: २७ डिसेंबर १९७२)

१९३८: शास्त्रीय गायिका एस. जानकी यांचा जन्म.

१९७७: भारतीय-अमेरिकन अभिनेते काल पेन यांचा जन्म.

=========================================

क) २३ एप्रिल रोजी झालेले मृत्यू.
   -------------------------

१६१६: इंग्लिश नाटककार, लेखक आणि अभिनेते विल्यम शेक्सपियर यांचे निधन. (जन्म: २३ एप्रिल १५६४)

१८५०: काव्यातील स्वच्छंदतावादाचे प्रणेते इंग्लिश कवी विल्यम वर्डस्वर्थ यांचे निधन. (जन्म: ७ एप्रिल १७७०)

१९२६: ब्रिटिश वनस्पतिशास्त्रज्ञ हेन्री बी. गुप्पी यांचे निधन. (जन्म: २३ डिसेंबर १८५४)

१९५८: निष्ठावान समर्थभक्त, समर्थ वाङ्‌मयाचे आणि संप्रदायाचे अभ्यासक व प्रकाशक शंकर श्रीकृष्ण देव यांचे निधन. (जन्म: १० ऑक्टोबर १८७१)

१९६८: पतियाळा घराण्याचे गायक व वीणावादक बडे गुलाम अली खाँ ऊर्फ सबरंग यांचे निधन. (जन्म: २ एप्रिल १९०२)

१९८६: इंग्लिश क्रिकेट खेळाडू जिम लेकर यांचे निधन. (जन्म: ९ फेब्रुवारी १९२२)

१९९२: ख्यातनाम चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक सत्यजित रे यांचे निधन. (जन्म: २ मे १९२१)

१९९७: इंग्लिश क्रिकेटपटू डेनिस कॉम्पटन यांचे निधन. (जन्म: २३ मे १९१८)

२०००: ४० वर्षे लालबागमधील भारतमाता चित्रपटगृह चालवणारे बाबासाहेब भोपटकर यांचे निधन.

२००१: संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे नेते आणि गोवा मुक्ती संग्रामातील सेनापती जयंतराव टिळक यांचे निधन. (जन्म: १२ ऑक्टोबर १९२१)

२००७: रशियन फेडरेशनचे पहिले अध्यक्ष बोरिस येलत्सिन यांचे निधन. (जन्म: १ फेब्रुवारी १९३१)

२०१३: पार्श्वगायिका शमशाद बेगम यांचे निधन. (जन्म: १४ एप्रिल १९१९)

=========================================


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-23.04.2022-शनिवार.