२७-एप्रिल–दिनविशेष

Started by Atul Kaviraje, April 27, 2022, 11:28:32 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२७.०४.२०२२-बुधवार. जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"


                                      "२७-एप्रिल–दिनविशेष"
                                     ----------------------


अ) २७ एप्रिल रोजी झालेल्या घटना.
   ----------------------------

१८५४: पुण्याहून मुंबईला तारायंत्राद्वारे पहिला संदेश पाठविला गेला.

१९०८: चौथ्या ऑलिम्पिक खेळांना लंडन येथे सुरुवात झाली.

१९४१: दुसरे महायुद्ध – जर्मन फौजांनी अथेन्समधे प्रवेश केला.

१९६१: सिएरा लिओनला ग्रेट ब्रिटनकडून स्वातंत्र्य मिळाले.

१९७४: राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी अमेरिकेतील वॉशिंग्टन येथे १०,००० लोकांनी निदर्शने केली.

१९९२: बॅटी बूथरायड ह्या ब्रिटिश हाऊस ऑफ कॉमन्सच्या लोकप्रतिनिधी निवडून येणारया पहिल्या महिला ठरल्या.

१९९९: एकाच अग्निबाणाद्वारे एकापेक्षा अधिक उपग्रह प्रक्षेपित करण्याची प्रणाली भारतात तयार झाली.

२००५: एअरबस ए-३८० जातीच्या विमानाचे प्रथम प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.

२०११: अमेरिकेच्या दक्षिण भागात टोनँडोंचा उद्रेक त्यात ३०० ठार झाले.

=========================================

ब) २७ एप्रिल रोजी झालेले जन्म.
  --------------------------

१४७९: पुष्टि पंथाचे संस्थापक वल्लभाचार्य यांचा जन्म. (निधन: २६ जून १५३१)

१७९१: मोर्स कोड व तारायंत्राचे जनक आणि चित्रकार सॅम्युअल मोर्स यांचा जन्म. (मृत्यू: २ एप्रिल १८७२)

१८२२: अमेरिकेचे १८ वे राष्ट्राध्यक्ष युलिसीस एस. ग्रॅन्ट यांचा जन्म. (मृत्यू: २३ जुलै १८८५)

१८८३: नाटककार भार्गवराम विठ्ठल वरेरकर उर्फ मामा वरेरकर यांचा जन्म. (मृत्यू: २३ सप्टेंबर १९६४)

१९१२: भारतीय अभिनेत्री, नृत्यांगना, आणि कोरिओग्राफर जोहरा सेहगल यांचा जन्म. (मृत्यू: १० जुलै २०१४)

१९२०: महात्मा गांधींचे अनुयायी डॉ. मणिभाई भीमभाई देसाई यांचा जन्म. (मृत्यू: १४ नोव्हेंबर १९९३)

१९२७: मार्टिन ल्युथर किंग यांची पत्नी कोरेटा स्कॉट किंग यांचा जन्म.

१९७६: पटकथालेखक भारतीय दिग्दर्शक फैसल सैफ यांचा जन्म.

=========================================

क) २७ एप्रिल रोजी झालेले मृत्यू.
   --------------------------

१५२१: पोर्तुगीज शोधक फर्डिनांड मॅगेलन यांचे निधन.

१९८०: पद्मश्री सहकारमहर्षी विठ्ठलराव एकनाथराव विखे पाटील यांचे निधन. (जन्म: २९ ऑगस्ट १९०१)

१८८२: अमेरिकन लेखक व तत्वज्ञ राल्फ वाल्डो इमर्सन यांचे निधन. (जन्म: २५ मे १८०३)

१९८९: पॅनासोनिक कंपनी चे स्थापक कोनोसुके मात्सुशिता यांचे निधन. (जन्म: २७ नोव्हेंबर १८९४)

१८९८: ज्योतिर्विद शंकर बाळकृष्ण दीक्षित यांचे निधन. (जन्म: २१ जुलै १८५३)

२००२: बार्बी डॉल या प्रसिद्ध बाहुली च्या जनक रुथ हँडलर यांचे निधन. (जन्म: ४ नोव्हेंबर १९१६)

२०१७: भारतीय अभिनेते विनोद खन्ना यांचे निधन. (जन्म: ६ ऑक्टोबर १९४६)

=========================================


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-27.04.2022-बुधवार.