२८-एप्रिल–दिनविशेष

Started by Atul Kaviraje, April 28, 2022, 11:29:52 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२८.०४.२०२२-गुरुवार. जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"


                                     "२८-एप्रिल–दिनविशेष"
                                    ----------------------


अ) २८ एप्रिल रोजी झालेल्या घटना.
   ----------------------------

१९१६: होम रुल लीगची स्थापना झाली.

१९२०: अझरबैजान यांचा सोविएत युनियनमधे समावेश झाला.

१९६९: चार्ल्स गॉल यांनी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

२००१: डेनिस टिटो हे पैसे देउन अंतराळात प्रवास करणारे पहिला अंतराळ प्रवासी झाले.

२००३: ऍपल कम्प्यूटर इन्क. ने आयट्यून्स स्टोअर प्रकाशित केले.

=========================================

ब) २८ एप्रिल रोजी झालेले जन्म.
  --------------------------

१७५८: अमेरिकेचे ५ वे राष्ट्राध्यक्ष जेम्स मोन्‍रो यांचा जन्म. (मृत्यू: ४ जुलै १८३१)

१८५४: लोकमान्य टिळकांचे निकटचे सहकारी वासुकाका जोशी यांचा जन्म. (मृत्यू: १२ जानेवारी १९४४)

१९०८: ऑस्ट्रियाचे व्यापारी व नाझीविरोधी ऑस्कार शिंडलर यांचा जन्म.

१९१६: प्रसिद्ध लक्झरी स्पोर्ट्स कार लॅम्बोर्गिनी चे निर्माते फारूशियो लॅम्बोर्गिनी यांचा इटली येथे जन्म. (मृत्यू: २० फेब्रुवारी  १९९३)

१९२९:  सर्वोत्कृष्ट पोशाख डिझाइनसाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्या वेशभूषा डिझाईनर भानु अथैया यांचा जन्म. (निधन: १५ ऑक्टोबर २०२०)

१९३१: लेखक मधु मंगेश कर्णिक यांचा जन्म.

१९३७: इराकी हुकूमशहा आणि इराकचे ५वे अध्यक्ष सद्दाम हुसेन यांचा जन्म. (मृत्यू: ३० डिसेंबर २००६)

१९४२: इंग्लिश क्रिकेटर माईक ब्रेअर्ली यांचा जन्म.

१९६८: झिम्बाब्वेचे क्रिकेटपटू अँडी फ्लॉवर यांचा जन्म.

=========================================

क) २८ एप्रिल रोजी झालेले मृत्यू.
   --------------------------

१७४०: थोरले बाजीराव पेशवे ऊर्फ श्रीमंत बाजीराव बल्लाळ बाळाजी भट यांचे नर्मदातीरी रावेरखेडी येथे निधन. (जन्म: १८ ऑगस्ट १७००)

१९४५: इटलीचे हुकूमशहा बेनिटो मुसोलिनी यांचा गोळ्या घालून मृत्यू. (जन्म: २९ जुलै १८८३)

१९७८: अफगाणिस्तानचे पहिले अध्यक्ष मोहम्मद दाऊद खान यांचे निधन. (जन्म: १८ जुलै १९०९)

१९९२: ज्ञानपीठ पुरस्कारविजेते कन्नड साहित्यिक आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. विनायक कृष्ण गोकाक यांचे निधन. (जन्म: ९ ऑगस्ट १९०९)

१९९८: जलदगती गोलंदाज रमाकांत देसाई यांचे निधन. (जन्म: २० जून १९३९)

=========================================


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-28.04.2022-गुरुवार.