३०-एप्रिल–दिनविशेष

Started by Atul Kaviraje, April 30, 2022, 11:44:43 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-३०.०४.२०२२-शनिवार.जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"


                                     "३०-एप्रिल–दिनविशेष"
                                    ---------------------


अ) ३० एप्रिल रोजी झालेल्या घटना.
   ----------------------------

१४९२: स्पेनने ख्रिस्तोफर कोलंबस यांना त्यांच्या शोधाकार्यासाठी कमीशन दिले.

१६५७: शिवाजी महाराजांनी मोगलांच्या ताब्यात असलेल्या जुन्नर शहरावर हल्ला करून ते लुटले.

१७८९: जॉर्ज वॉशिंग्टन हे अमेरिकेचे पहिले निवडलेले राष्ट्राध्यक्ष बनले.

१९३६: वर्ध्याजवळ महात्मा गांधींनी सेवाग्राम आश्रम स्थापन केला.

१९७७: ९ राज्यांमधील विधानसभा बरखास्त झाली आणि जनसंघ, समाजवादी पक्ष, संघटना काँग्रेस आणि भारतीय लोकदल या पक्षांनी जनता पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला.

१९८२: कलकत्त्यात बिजान सेतु हत्याकांड घडले.

१९९५: उत्तर आयर्लंडला भेट देणारे बिल क्लिंटन हे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष ठरले.

१९९६: थेऊर येथील श्री चिंतामणी मंदिराच्या आवारातील श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांच्या स्मृ्तिमंदिराचे उद्‍घाटन झाले.

२००९: ख्रायस्लर कंपनीने दिवाळखोरी घोषित केली.

=========================================

ब) ३० एप्रिल रोजी झालेले जन्म.
  --------------------------

१७७७: जर्मन गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ कार्ल फ्रेड्रिक गाऊस यांचा जन्म. (मृत्यू: २३ फेब्रुवारी १८५५)

१८७०: भारतीय चित्रपट उद्योगाचे जनक धुंडिराज गोविंद ऊर्फ दादासाहेब फाळके यांचा जन्म. (मृत्यू: १६ फेब्रुवारी १९४४)

१९०९: माणिक बंडोजी इंगळे ऊर्फ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्म. (मृत्यू: ११ ऑक्टोबर १९६८)

१९१०: साहित्य अकादमी पुरस्कार विजेते तेलुगू कवी आणि गीतकार श्रीरंगम श्रीनिवास राव ऊर्फ श्री श्री राव यांचा जन्म. (मृत्यू: १५ जून १९८३)

१९२१: जीपीएस चे सहसंशोधक रॉजर एल. ईस्टन यांचा जन्म. (मृत्यू: ८ मे २०१४)

१९२६: मराठी संगीतकार श्रीनिवास खळे यांचा जन्म. (मृत्यू: २ सप्टेंबर २०११)

१९८७: भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्मा यांचा जन्म.

=========================================

क) ३० एप्रिल रोजी झालेले मृत्यू.
   --------------------------

१०३०: तुर्कीच्या गझनवी साम्राज्याचा शासक मोहंमद गझनी यांचे निधन. (जन्म: २ ऑक्टोबर ९७१)

१८७८: साक्षात्कारी सत्पुरुष व दत्तावतारी स्वामीमहाराज अक्‍कलकोट यांनी समाधी घेतली.

१९१३: व्याकरणकार आणि निबंधकार मोरो केशव दामले यांचे निधन. (जन्म: ७ नोव्हेंबर १८६८)

१९४५: जर्मनीचे नाझी हुकूमशहा अ‍ॅडॉल्फ हिटलर यांनी आत्महत्या केली. (जन्म: २० एप्रिल १८८९)

२००१: प्रयोग परिवार या संकल्पनेचे प्रवर्तक, गणितज्ञ आणि कृषी शास्त्रज्ञ श्रीपाद अच्युत दाभोळकर यांचे निधन. (जन्म: २१ ऑगस्ट १९२४)

२००३: मराठी साहित्यिक वसंत पोतदार यांचे निधन. (जन्म: २० नोव्हेंबर १९३९ – आष्टी, उस्मानाबाद)

२०१४: भारतीय चित्रकार आणि सेट डिझायनर खालिद चौधरी यांचे निधन. (जन्म: २० डिसेंबर १९१९)

=========================================


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-30.04.2022-शनिवार.