०२-मे–दिनविशेष

Started by Atul Kaviraje, May 03, 2022, 12:12:49 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     काल दिनांक-०२.०५.२०२२-सोमवार होता. जाणून घेऊया,कालच्या दिवसाचे "दिन-विशेष"


                                      "०२-मे–दिनविशेष"
                                     ------------------


अ) ०२ मे रोजी झालेल्या घटना.
   -------------------------

१९०८: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लंडनमधे प्रथमच शिवजयंती उत्सव साजरा केला.

१९१८: जनरल मोटर्सने शेवरले मोटर कंपनी विकत घेतली.

१९२१: स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे बंधू बाबाराव व तात्याराव यांची अंदमानातुन हिन्दुस्थानात पाठवणी केली.

१९४५: दुसरे महायुद्ध – सोविएत सैन्याने बर्लिनचा पाडाव केला.

१९९४: बँक ऑफ कराड  चे बँक ऑफ इंडिया मधे विलिनीकरण झाले.

१९९४: नगर जिल्ह्यातील रामदास ढमाले या अपंग युवकाने पुण्यातील टिळक तलावात सलग ३७ तास ४५ मिनिटे पोहून एक नवा विक्रम प्रस्थापित केला.

१९९७: टोनी ब्लेअर इंग्लंडचे पंतप्रधान बनले.

१९९७: राष्ट्रीय अ बुद्धीबळ अजिंक्यपद स्पर्धेत पुण्याच्या अभिजित कुंटेने इंटरनॅशनल मास्टर किताबासाठीचे निकष पूर्ण केले.

१९९९: कोल्हापूर येथील शर्वरी मानसिंग पवार या तीन वर्षे चार महिन्याच्या बालिकेने ५१.१ कि. मी. अंतर न थांबता स्केटिंग करुन ३ तास ५१ मिनिटांत पार केले.

१९९९: मीरा मोस्कोसो पनामा देशाच्या अध्यक्ष म्हणून निवडलेल्या पहिल्या महिला ठरल्या.

२००४: एस. राजेन्द्रबाबू यांनी भारताचे ३४वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

२०११: अमेरिकन सैन्याच्या Navy Seals 6 या विशेष तुकडीने ओसामा बिन लादेन याची पाकिस्तानातील अ‍ॅबोटाबाद येथे हत्या केली.

२०१२: नॉर्वेजियन चित्रकार एडवर्ड माँच यांचे द स्क्रीम हे चित्र लिलावात १२० मिलियन डॉलर्सला विकले गेले. हा एक नवा जागतिक विक्रम बनला.

=========================================

ब) ०२ मे रोजी झालेले जन्म.
  -----------------------

१९२०: शास्त्रीय व नाट्यसंगीत गायक डॉ. वसंतराव देशपांडे यांचा जन्म. (मृत्यू: ३० जुलै १९८३)

१९२१: ख्यातनाम चित्रपट निर्माते व दिग्दर्शक आणि भारतरत्‍न तसेच विशेष ऑस्कर पुरस्कार विजेते सत्यजित रे यांचा जन्म. (मृत्यू: २३ एप्रिल १९९२)

१९२९: भूतानचे राजे जिग्मे दोरजी वांगचुकयांचा जन्म. (मृत्यू: २१ जुलै १९७२)

१९६९: वेस्ट इंडीजचा क्रिकेटपटू ब्रायन लारा यांचा जन्म.

१९७२: स्काईप सॉफ्टवेअर चे सहनिर्माते अहटी हेनला यांचा जन्म.

=========================================

क) ०२ मे रोजी झालेले मृत्यू.
   ----------------------

१५१९: इटालियन चित्रकार, संशोधक, गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ लिओनार्डो दा विंची यांचे निधन. (जन्म: १५ एप्रिल १४५२)

१६८३:शिवाजी महाराजांच्या सांगण्यावरुन राज्यव्यवहारकोश तयार करणारे मुत्सद्दी रघुनाथ नारायण हणमंते तथा रघुनाथपंडित यांचे निधन.

१९६३: महाराष्ट्रातील जादूगारांचे आचार्य डॉ. के. बी. लेले यांचे निधन. (जन्म: २ नोव्हेंबर १८८२)

१९७३: लेखक, तत्त्वचिंतक व समीक्षक दिनकर केशव तथा दि. के. बेडेकर यांचे निधन. (जन्म: ८ जून १९१०)

१९७५: चित्रपट दिग्दर्शक, लेखक, कवी व गीतकार शांताराम आठवले यांचे निधन. (जन्म: २१ जानेवारी १९१०)

१९९८: गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिक, काँग्रेसचे नेते, ५व्या लोकसभेचे सदस्य पुरुषोत्तम काकोडकर यांचे निधन. (जन्म: १८ मे १९१३)

१९९९: जयपूर-अत्रौली घराण्याचे शास्त्रीय गायक पं. सुधाकरबुवा डिग्रजकर यांचे निधन.

२०११: अल कायदा चे संस्थापक ओसामा बिन लादेन अमेरिकन सैन्याने ठार मारले. (जन्म: १० मार्च १९५७)

=========================================


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-03.05.2022-मंगळवार.