०४-मे–दिनविशेष

Started by Atul Kaviraje, May 05, 2022, 12:46:05 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     काल दिनांक-०४.०५.२०२२-बुधवार होता. जाणून घेऊया,कालच्या दिवसाचे "दिन-विशेष"


                                      "०४-मे–दिनविशेष"
                                     ------------------


अ) ०४ मे रोजी झालेल्या घटना.
   -------------------------

१७९९: श्रीरंगपट्टणमच्या लढाईत टिपू सुलतान ब्रिटिशांकडून मारला गेला.

१८५४: भारतातील पहिले टपाल तिकीट प्रकाशित झाले.

१९०४: अमेरिकेने पनामा कालव्याच्या बांधकामास सुरुवात केली.

१९१०: रॉयल कॅनेडियन नेव्ही ची स्थापना.

१९५९:  पहिले ग्रॅमी पुरस्कार आयोजीत केले गेले.

१९६७: श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर नाशिक येथील मंदिरात जाऊन देवाची पूजा करण्याचा अधिकार सर्वांना आहे असा उच्च न्यायालयाचा निर्णय.

१९७९: मार्गारेट थॅचर युनायटेड किंग्डमच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या.

१९८९: सर्व पंचायत समित्यांमध्ये महिलांसाठी ३० टक्के जागा राखीव, अशी घोषणा पंतप्रधान राजीव गांधी यांनी केली.

१९९२: संगीतकार भूपेन हजारिका यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला.

१९९५: महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने बॉम्बे हे नाव बदलून मुंबई असे नामकरण करण्याचा निर्णय घेतला.

१९९६: जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत भारताला ६ तर एन. कुंजुराणीदेवीला दोन रौप्यपदके मिळाली.

=========================================

ब) ०४ मे रोजी झालेले जन्म.
  -----------------------

१००८: पर्शियन सूफी संत ख्वाजा अब्दूल्ला अन्सारी यांचा जन्म.

१००८: फ्रान्सचा राजा हेन्‍री (पहिला) यांचा जन्म. (मृत्यू: ४ ऑगस्ट १०६०)

१६४९: बुंदेलखंड चे महाराजा छत्रसाल बुंदेला यांचा जन्म. (मृत्यू: २० डिसेंबर १७३१)

१६५५: पियानोचे निर्मिते बार्टोलोमीओ क्रिस्टोफोरी यांचा जन्म. (मृत्यू: २७ जानेवारी  १७३१)

१७६७: दाक्षिणात्य संगीतकार त्यागराज यांचा जन्म. (मृत्यू: ६ जानेवारी १८४७)

१८२५: ब्रिटीश जीवशास्रज्ञ आणि विज्ञानकथा लेखक थॉमास हक्सले यांचा जन्म. (मृत्यू: २९ जून १८९५ – इस्ट्बोर्न, इंग्लंड)

१८४७: धार्मिक आणि राष्ट्रीय मनोवृत्तीचे पुण्यातील एक नामांकित धन्वंतरी व लोकमान्य टिळकांचे स्‍नेही महर्षी विनायक रामचंद्र उर्फ अण्णासाहेब पटवर्धन यांचा जन्म. (मृत्यू: २ फेब्रुवारी १९१७)

१९२८: इजिप्तचे ४थे राष्ट्राध्यक्ष होस्नी मुबारक यांचा जन्म.

१९२९: ब्रिटिश अभिनेत्री, संयुक्त राष्ट्रांच्या बालक निधीच्या (UNICEF) सदिच्छा प्रतिनिधी ऑड्रे हेपबर्न यांचा जन्म. (मृत्यू: २० जानेवारी १९९३)

१९३३: प्रख्यात मराठी कादंबरीकार बाबा कदम यांचा जन्म. (मृत्यू: ९ ऑक्टोबर २००९)

१९३४: भावगीत गायक अरुण दाते यांचा जन्म.

१९४०: इंग्लिश कादंबरीकार रॉबिन कुक यांचा जन्म.

१९४२: विज्ञान आणि तंत्रज्ञान सल्लगार सॅम पित्रोदा यांचा जन्म.

१९४३: भारतीय अर्थशास्त्रज्ञ प्रसांत पटनाईक याचा जन्म.

१९४५: ज्येष्ठ पत्रकार एन. राम यांचा जन्म.

१९८४: बांगला देशचा क्रिकेटपटू मंजुरूल इस्लाम यांचा जन्म. (मृत्यू: १६ मार्च २००७)

=========================================

क) ०४ मे रोजी झालेले मृत्यू.
   -----------------------

१७९९: म्हैसूरचा वाघ टिपू सुलतान यांचा श्रीरंगपट्टण येथे मृत्यू. (जन्म: २० नोव्हेंबर १७५०)

१८४९: रवीन्द्रनाथ टागोर यांचे मोठे भाऊ बंगाली साहित्यिक आणि चित्रकार ज्योतीन्द्रनाथ टागोर यांचे निधन. (जन्म: ४ मार्च १९२५)

१९३८: ज्युदोचे संस्थापक कानो जिगोरो यांचे निधन. (जन्म: २८ ऑक्टोबर  १८६०)

१९८०: आधुनिक कवी, चतुरस्त्र लेखक, पत्रकार आणि नाटककार अनंत कानेकर उर्फ आत्माराम यांचे निधन.

१९६८: बंगाली साहित्यिक आशुतोष मुखोपाध्याय यांचे निधन.

१९८०: युगोस्लाव्हियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष जोसेफ टिटो यांचे निधन. (जन्म: ७ मे १८९२)

१९८०: सोविएत लँड नेहरू पुरस्कार विजेते चतुरस्त्र साहित्यिक कवी व पत्रकार, पद्मश्री अनंत काणेकर  यांचे निधन. (जन्म: २ डिसेंबर १९०५)

२००८: तबलावादक किशन महाराज यांचे निधन. (जन्म: ३ सप्टेंबर १९२३)

=========================================


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-05.05.2022-गुरुवार.