मृत्यूचे वय माझे

Started by @गोविंदराज@, May 07, 2022, 10:01:03 AM

Previous topic - Next topic

@गोविंदराज@

रोख ठोक असताना का  मी खुर्दा झालो...
असा काय गुन्हा केला कि जिवंतपणी मुर्दा झालो...

वर वर दिसण्या इतपत मी सजीव उरलो...
आतून मात्र अवेळी नकळत निर्जीव ठरलो....

बुद्धी आणि मन कसं बधीर झालंय...
मृत्यू साठी जीवन का एवढं अधीर झालंय ?

उगीच सुरु आहेत आता नामरूपी श्वास...
पाहतोय मी डोळ्यांनी होतोय माझा ऱ्हास...

जगेल कदाचित मी आता कि मरेल..
असाच अजून किती कसा मी झुरेल...

निकामी होतायत हळू हळू अवयव माझे...
हेच तर नसेल ना मृत्यूचे वय माझे?

गोविंदराज
०६.०५.२०२२