१५-मे–दिनविशेष

Started by Atul Kaviraje, May 15, 2022, 12:41:22 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१५.०५.२०२२-रविवार. जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"


                                      "१५-मे–दिनविशेष"
                                     ------------------


अ) १५ मे रोजी झालेले घटना.
   -----------------------

१७१८: जगातल्या पहिल्या मशीन गन बंदूकेचे पेटंट जेम्स पक्कल यांनी घेतले.

१७३०: रॉबर्ट वॉल्पोल युनायटेड किंग्डमचे पहिले पंतप्रधान झाले.

१८११: पॅराग्वेला स्पेनकडून स्वातंत्र्य मिळाले.

१८३६: सूर्यग्रहणातील खग्रास स्थितीपुर्वी दिसणार्‍या बेलीज बीड्‌सचे शास्त्रज्ञ फ्रॅन्सिस बेली यांनी सर्वप्रथम निरीक्षण केले.

१९२८: मिकी माऊस कार्टून प्लेन क्रेजी या शो मधून पहिल्यांदा प्रसारित केले गेले.

१९३५: मॉस्को शहरात भुयारी रेल्वेची सुरूवात झाली.

१९४०: दुसरे महायुद्ध – हॉलंडने जर्मनीसमोर शरणागती पत्करली.

१९४०: सॅन बर्नाडिनो, कॅलिफोर्निया येथे मॅक्डोनाल्डस (McDonald's) चे पहिले उपहारगृह सुरू झाले.

१९५८: सोव्हिएत युनियनने स्पुतनिक ३ चे प्रक्षेपण केले.

१९६०: सोव्हिएत युनियनने स्पुतनिक ४ चे प्रक्षेपण केले.

१९६१: पुण्याच्या चतु:शृंगी वीजकेंद्रात प्रचंड स्फोट होऊन ९ जणांचा मृत्यू.

२०००: दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील मंडीपुरा येथे अतिरेक्यांनी पेरलेल्या भूसुरुंगाच्या स्फोटात जम्मू – काश्मीरचे ऊर्जा राज्यमंत्री गुलाम हसन बट यांच्यासह ५ जण ठार.

=========================================

ब) १५ मे रोजी झालेले जन्म.
  -----------------------

१८१७: भारतीय तत्त्ववेत्ते आणि लेखक देवेन्द्रनाथ टागोर यांचा जन्म. (मृत्यू: १९ जानेवारी १९०५)

१८५९: नोबेल पारितोषिकविजेते फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ पिअर क्युरी यांचा जन्म. (मृत्यू: १९ एप्रिल १९०६)

१९०३: साहित्य मीमांसक, कवी व विचारवंत रा. श्री. जोग यांचा जन्म. (मृत्यू: २१ फेब्रुवारी १९७७)

१९०७: क्रांतिकारक सुखदेव थापर यांचा जन्म. (मृत्यू: २३ मार्च १९३१)

१९६७: अभिनेत्री माधुरी दिक्षीत-नेने यांचा जन्म.

=========================================

क) १५ मे रोजी झालेले मृत्यू.
   ----------------------

१३५०: संत जनाबाई यांचे निधन.

१७२९: वैशाख व. १४, शके १६५१ मराठेशाहीच्या आपत्‌प्रसंगी पराक्रम गाजवणारे खंडेराव दाभाडे यांचे निधन.

१९९३: स्वतंत्र भारताचे पहिले लष्करप्रमुख फील्डमार्शल के. एम. करिअप्पा यांचे निधन. (जन्म: २८ जानेवारी १८९९)

१९९४: जागतिक हौशी स्‍नूकर अजिंक्यपद स्पर्धेतील एकमेव भारतीय विजेता ओम अग्रवाल यांचे निधन.

१९९४: चित्रकार व कॅलेंडर निर्मितीचे अध्वर्यू पी. सरदार यांचे निधन.

२०००: जुन्या जमान्यातील चित्रपट व नाट्य अभिनेते सज्जन यांचे निधन.

२००७: लिबर्टी विद्यापीठाचे स्थापक जेरी फेलवेल यांचे निधन. (जन्म: ११ ऑगस्ट १९३३)

=========================================


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-15.05.2022-रविवार.