१८-मे–दिनविशेष

Started by Atul Kaviraje, May 18, 2022, 12:13:26 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१८.०५.२०२२-बुधवार. जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"


                                      "१८-मे–दिनविशेष"
                                     ------------------


अ) १८ मे रोजी झालेल्या घटना.
   -------------------------

१८०४: नेपोलिअन बोनापार्ट फ्रान्सचे सम्राट झाले.

१९१२: पूर्णपणे भारतात बनवलेला पुंडलिक हा मूकपट प्रदर्शित झाला.

१९३८: प्रभात चा गोपालकृष्ण हा चित्रपट मुंबईच्या सेंट्रल सिनेमात प्रदर्शित झाला.

१९४०: प्रभात चा संत ज्ञानेश्वर हा चित्रपट मुंबई व पुणे या ठिकाणी एकाच दिवशी प्रदर्शित झाला.

१९७२: दापोली येथे कोकण कृषी विद्यापीठाची स्थापना झाली.

१९७४: भारताने पोखरण येथे आण्विक अस्त्राची पहिली यशस्वी चाचणी केली.

१९९०: फ्रान्स च्या टीजीव्ही रेल्वे ने ५१५.३ किमी/ताशी वेगाने धावण्याचा नवीन जागतिक विक्रम केला.

१९९१: रशियाच्या सोयुझ अंतराळातुन भ्रमण करणारी हेलन शेरमन ही महिला पहिली ब्रिटिश अंतराळयात्री बनली.

१९९५: स्थानिक ठिकाणचे ५,००० रुपयांपर्यंतचे धनादेश खात्यात भरल्यानंतर तिसर्‍या दिवशी ती रक्‍कम ग्राहकास काढण्याची मुभा द्यावी, असा आदेश रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने दिला.

१९९८: पुण्याच्या सुरेन्द्र चव्हाणने जगातील सर्वोच्‍च एव्हरेस्ट शिखर सर केले.

२००९: श्रीलंका सरकारने एलटीटीई ला पराभूत करून सुमारे २६ वर्षIच्या युद्धाला संपवले.

=========================================

ब) १८ मे रोजी झालेले जन्म.
  -----------------------

१०४८: पर्शियन तत्त्वज्ञ, गणितज्ञ, खगोलशास्त्रज्ञ आणि कवी ओमर खय्याम यांचा जन्म. (मृत्यू: ४ डिसेंबर ११३१)

१६८२:  छत्रपती शाहू महाराज तथामूळ नाव शिवाजी यांचा जन्म. (मृत्यू: १५ डिसेंबर १७४९)

१८७२: ब्रिटिश गणितज्ञ, तत्त्वज्ञ आणि इतिहासकार बर्ट्रांड रसेल यांचा जन्म. (मृत्यू: २ फेब्रुवारी १९७०)

१९१३: गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिक, काँग्रेसचे नेते पुरुषोत्तम काकोडकर यांचा जन्म. (मृत्यू: २ मे १९९८)

१९२०: पोप जॉन पॉल (दुसरा) यांचा जन्म. (मृत्यू: २ एप्रिल २००५)

१९३३: भारताचे ११ वे पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचा जन्म.

१९७९: माईनक्राफ्ट या गेम चे सहसंस्थापक जेन्स् बर्गेंस्टन यांचा जन्म.

=========================================

क) १८ मे रोजी झालेले मृत्यू.
   ----------------------

१८०८: बोर्नबॉन व्हिस्की चे निर्माते एलीया क्रेग यांचे निधन.

१८४६: मराठी पत्रकारितेचे पितामह बाळशास्त्री जांभेकर यांचे निधन. (जन्म: ६ जानेवारी १८१२)

१९६६: वनस्पतीशास्त्रज्ञ पंचानन माहेश्वरी यांचे निधन. (जन्म: ९ नोव्हेंबर १९०४)

१९९७: भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या स्त्री कलाकार कमलाबाई कामत तथा कमलाबाई रघुनाथ गोखले यांचे निधन. (जन्म: ६ सप्टेंबर १९०१)

१९९९: पहिले राष्ट्रीय बुद्धीबळ विजेते रामचंद्र सप्रे यांचे निधन.

२००९: एल. टी. टी. ई. (Liberation Tigers of Tamil Eelam) चे  संस्थापक वेल्लुपल्ली प्रभाकरन यांचे निधन. (जन्म: २६ नोव्हेंबर १९५४)

२०१२: भारतीय धार्मिक नेते जय गुरूदेव यांचे निधन.

२०१७: भारतीय अभिनेत्री रीमा लागू यांचे निधन. (जन्म: २१ जुन १९५८)

=========================================


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-18.05.2022-बुधवार.