निरोप

Started by amoul, June 22, 2010, 07:03:23 PM

Previous topic - Next topic

amoul

काही मानसं सोडून जातात कायमच्यासाठी,
फक्त त्यांच्या आठवणी उरतात निरोप देणार्याच्या हाती.

पण जाताना ते करतात अश्रूंनी वाट ओली,
त्याच वाटेवर अंकुर फुटतात आशेचे,
आणि सांगतात पुन्हा होईल  भेट आपुली.

जाणारा जाताना, ओल्या डोळ्यांनी,
निरोप देणाऱ्याची सामोरी मूर्ती साठवतो.
निरोप देणारा मात्र निरोपाच्या नंतर जाणाऱ्याची,
पाठमोरी आकृती वारंवार मनी आठवतो.

दोघांच्याही मनातला तो एकाच घाव असतो,
आणि एकांतात त्यातूनच वाहणारा विरहाचा स्त्राव असतो.

जाणारा मग एकदा तरी वळून बघतो पाठी,
मग पुन्हा निरोप होतात पुन्हा कधी न भेटण्यासाठी.
निरोप देणारा वेळ, वार, तारीख सारं विसरून जातो,
तो क्षण मात्र पुन्हा पुन्हा डोळ्यात तरळून राहतो.

.................अमोल

gaurig


santoshi.world


LAVESH

निरोप देणारा वेळ, वार, तारीख सारं विसरून जातो,
तो क्षण मात्र पुन्हा पुन्हा डोळ्यात तरळून राहतो


K_a_shinde

जाणारा मग एकदा तरी वळून बघतो पाठी,
मग पुन्हा निरोप होतात पुन्हा कधी न भेटण्यासाठी.

[/size][/color]
[/size][/color]
[/size][/color]hya oli khoop chhan ahet

PRASAD NADKARNI