काही तरी बोलुया क्षण भुंगुर आयुष्याबद्दल.....🙏🏿

Started by Ashoka1180, May 21, 2022, 03:19:52 PM

Previous topic - Next topic

Ashoka1180

काही तरी बोलुया क्षण भुंगुर आयुष्याबद्दल.....🙏🏿
क्षण भुंगुर आयुष्याबद्दल बोलावे।
दुधावरच्या साई सारखे जपावे
पाण्यावरच्या बुडबुड्या प्रमाणे अनुभवावे।।
क्षण भुंगुर आयुष्याबद्दल बोलावे।
समईतील तेला प्रमाणे जपावे
पतंगाच्या मांज्या प्रमाणे तोलावे।।
आयुष्याला जपता जपता वेळ आली न कळुन।
आयुष्य गेले निसटून।।
माझे हे करायचे राहिले ते करायचे राहिले।
मी जे कमविले ते सर्व जाग्यावरच राहिले।।
अरे लोभ, मत्सर, अहंकाराच्या मुसाफिरा तु स्वताचा न राहिलास।
मग कशाला बेरीज वजाबाकीचा हिशेब ठेवतोस।।
साठी उलटली काठी आली।तुझ्याच घरात तुझी दाठी झाली।।
तरी म्हणे माझीच आहे शेतीवाडी
तुज स्वार्थाचे गणित कधी सुटले नाही।
माझे माझे म्हणण्याची सवय काही गेली नाही।।
अश्याच ऐका मध्यान्ह रात्री ,आला माझा काळ।
मला न उमजता घेऊन गेला मज प्राण .... दिर्घकाळ।।
माझे निस्तेज शरीर मात्र शिल्लक राहिले।
ते सुद्धा अग्नी देवाने खाऊन टाकले।।
A B katkar