२२-मे–दिनविशेष

Started by Atul Kaviraje, May 22, 2022, 12:18:25 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२२.०५.२०२२-रविवार. जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"


                                       "२२-मे–दिनविशेष"
                                      ------------------

अ) २२ मे रोजी झालेल्या घटना.
   -------------------------

१७६२: स्वीडन आणि प्रशियामधे हॅम्बुर्गचा तह झाला.

१९०६: राईट बंधूंनी उडणाऱ्या यंत्राचे (Flying Machine) पेटंट घेतले.

१९१५: स्कॉटलंडच्या ग्रेटना ग्रीन गावात ३ रेल्वेगाड्यांची टक्कर होऊन २२७ जण ठार आणि २४६ जण जखमी झाले.

१९२७: चीनच्या झिनिंग जवळ झालेल्या ८.३ तीव्रतेच्या भूकंपात २,००,००० लोक ठार झाले.

१९४२: दुसरे महायुद्ध – मेक्सिकोने दोस्त राष्ट्रांच्या बाजूने युद्धात उडी घेतली.

१९६०: ग्रेट चिलीयन भूकंप हा ९.५ तीव्रतेचा जगातील सर्वात शक्तिशाली भूकंप आहे.

१९६१: हुंडाबंदी विधेयकाला राष्ट्रपतींची संमती मिळून हुंडाबंदी कायदा अस्तित्त्वात आला.

१९७२: सिलोनने नवीन राज्यघटना स्वीकारुन ते प्रजासत्ताक बनले. त्या देशाचे श्रीलंका असे नामकरण झाले आणि त्याने राष्ट्रकुल देशांत प्रवेश केला.

१९८७: मेरठ जिल्ह्यात हाशिमपूरा हत्याकांड झाले.

२००४: भारताचे १३ वे पंतप्रधान म्हणून डॉ. मनमोहन सिंग सूत्रे हाती घेतली.

२०१५: आयर्लंड देश सार्वजानिक जनमतदानंतर समलिंगी विवाहाला कायदेशीर ठरवण्यासाठी जगातील पहिला देश बनला.

=========================================

ब) २२ मे रोजी झालेले जन्म.
   ----------------------

१४०८: हिंदू संत अन्नामचार्य यांचा जन्म. (मृत्यू: ४ एप्रिल १५०३)

१७७२: समाजसुधारक, धर्मसुधारक व ब्राम्हो समाजाचे संस्थापक राजा राम मोहन रॉय यांचा जन्म. (मृत्यू: २७ सप्टेंबर १८३३)

१७८३: विद्युत चुंबक आणि विद्युत मोटर चे शोधक विल्यम स्टर्जन यांचा जन्म. (मृत्यू: ४ डिसेंबर १८५०)

१८१३: जर्मन संगीतकार, संगीतसंयोजक व दिग्दर्शक रिचर्ड वॅग्‍नर यांचा जन्म. (मृत्यू: १३ फेब्रुवारी १८८३)

१८५९: स्कॉटिश डॉक्टर व शेरलॉक होम्स या गुप्तहेरकथांचे लेखक सर आर्थर कॉनन डॉइल यांचा जन्म. (मृत्यू: ७ जुलै १९३०)

१८७१: संस्कृत विद्वान, भाषांतरकार व शास्त्रसुधारक विष्णू वामन बापट यांचा जन्म. (मृत्यू: २० डिसेंबर १९३३)

१९०५: इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाचे सहसंशोधक बोडो वॉन बोररी यांचा जन्म. (मृत्यू: १७ जुलै १९५६)

१९०७: ब्रिटिश अभिनेता, दिग्दर्शक व निर्माता सर लॉरेन्स ऑलिव्हिये यांचा जन्म. (मृत्यू: ११ जुलै १९८९)

१९४०: भारतीय फिरकी गोलंदाज एरापल्ली अनंतराव श्रीनिवास प्रसन्ना यांचा जन्म.

१९४८: भारतीय अभिनेता आणि पटकथालेखक नेदुमुदी वेणू यांचा जन्म.

१९५९: भारतीय राजकारणी मेहबूबा मुफ्ती यांचा जन्म.

१९८४: फेसबुकचे सह-संस्थापक डस्टिन मॉस्कोविट्झ यांचा जन्म.

१९८७: सर्बियाचा टेनिस खेळाडू नोव्हान जोकोव्हिच यांचा जन्म.

=========================================

क) २२ मे रोजी झालेले मृत्यू.
   ----------------------

१५४५: भारतीय शासक शेरशाह सूरी यांचे निधन.

१८०२: अमेरिकेची पहिली फर्स्ट लेडी मार्था वॉशिंग्टन यांचे निधन. (जन्म: २ जून १७३१)

१८८५: जागतिक कीर्तीचे फ्रेन्च कादंबईकार, कवी आणि लेखक व्हिक्टर ह्यूगो यांचे निधन. (जन्म: २६ फेब्रुवारी १८०२)

१९९१: भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक व कामगार पुढारी कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांचे निधन. (जन्म: १० ऑक्टोबर १८९९)

१९९५: चित्रकार व शिल्पकार रविंद्र बाबुराव मेस्त्री यांचे निधन.

१९९८: लेखक, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. मधुकर आष्टीकर यांचे निधन. (जन्म: १ जानेवारी १९२८)

=========================================


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-22.05.2022-रविवार.