२३-मे–दिनविशेष

Started by Atul Kaviraje, May 23, 2022, 12:40:49 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२३.०५.२०२२-सोमवार.जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"

                                      "२३-मे–दिनविशेष"
                                     ------------------

अ) २३ मे रोजी झालेल्या घटना.
   -------------------------

१७३७: पोर्तुगीजांकडुन जिंकल्यानंतर पेशव्यांनी अर्नाळा किल्ला परत बांधून घेतला.

१८२९: सिरील डेमियनला अ‍ॅकॉर्डियन या वाद्याचे पेटंट मिळाले.

१९४९: पश्चिम जर्मनी हे राष्ट्र अस्तित्त्वात आले.

१९५१: तिबेट देशाने चीनबरोबर तिबेटच्या शांततेत मुक्तीसाठी सतरा बिंदू करार केला.

१९५६: आयुर्विमा व्यवसायाचे राष्ट्रीयीकरण करण्यासंबंधीचे विधेयक मंजूर झाले.

१९८४: बचेन्द्री पालने दुपारी १:०९ वाजता (भारतीय प्रमाण वेळ) माऊंट एव्हरेस्ट शिखर सर केले. हे शिखर सर करणारी ती पहिली भारतीय महिला आहे.

१९९५: जावा प्रोग्रामिंग लँग्वेज ची पहिली आवृत्ती प्रकाशीत केली गेली.

१९९७: माऊंट एव्हरेस्ट हे सर्वोच्‍च शिखर सर्वप्रथम सर करणार्‍या तेनसिंग नोर्गे यांचे नातू ताशी तेनसिंग यांनी माऊंट एव्हरेस्ट सर केले.

=========================================

ब) २३ मे रोजी झालेले जन्म.
   ----------------------

१०५२: फ्रान्सचा राजा फिलिप (पहिला) यांचा जन्म. (मृत्यू: २९ जुलै ११०८)

१७०७: स्वीडीश वनस्पतीतज्ञ कार्ल लिनिअस यांचा जन्म. (मृत्यू: १० जानेवारी १७७८)

१८७५: अमेरिकन उद्योगपती आल्फ्रेड पी. स्लोन यांचा जन्म. (मृत्यू: १७ फेब्रुवारी १९६६)

१८९६: गायक, अभिनेते, संगीत समीक्षक, संगीत रचनाकार, संगीत दिग्दर्शक व लेखक केशवराव भोळे यांचा जन्म. (मृत्यू: ९ नोव्हेंबर १९७७)

१९१८: इंग्लिश क्रिकेटपटू डेनिस कॉम्पटन यांचा जन्म. (मृत्यू: २३ एप्रिल १९९७)

१९१९: जयपूरच्या राजमाता महाराणी गायत्रीदेवी यांचा जन्म. (मृत्यू: २९ जुलै २००९)

१९२६: मार्क्सवादी कम्युनिस्ट नेते पी. गोविंद पिल्लई यांचा जन्म. (मृत्यू: २२ नोव्हेंबर २०१२)

१९२६: भारतीय बिशप बॅसिल साळदादोर डिसोझा यांचा जन्म. (मृत्यू: ५ सप्टेंबर १९९६)

१९३३: मुद्रितशोधन तज्ञ मोहन वेल्हाळ यांचा जन्म.

१९४३: पटकथालेखक आणि दिग्दर्शक कोवेलमूडी राघवेंद्र राव यांचा जन्म.

१९४५: भारतीय दिग्दर्शक, पटकथालेखक आणि लेखक पद्मराजन यांचा जन्म.(मृत्यू: २४ जानेवारी १९९१)

१९५१: रशियन बुद्धीबळपटू अनातोली कार्पोव्ह यांचा जन्म.

१९६५: क्रिकेटपटू वूर्केरी रमण यांचा जन्म.

=========================================

क) २३ मे रोजी झालेले मृत्यू.
   ----------------------

१८५७: फ्रेन्च गणितज्ञ ऑगस्टिन कॉशी यांचे निधन. (जन्म: २१ ऑगस्ट १७८९)

१९०६: नॉर्वेजियन नाटककार, दिग्दर्शक आणि कवी हेन्‍रिक इब्सेन यांचे निधन. (जन्म: २० मार्च १८२८)

१९३७: रॉकफेलर घराण्यातील पहिले उद्योगपती, स्टँडर्ड ऑईल उद्योगसमूह व अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील पहिल्या तेल उद्योगाचे संस्थापक जॉन डेव्हिसन रॉकफेलर यांचे निधन. (जन्म: ८ जुलै १८३९)

१९६०: निऑन लाईट चे निर्माते जॉर्ज क्लोडे यांचे निधन. (जन्म: २४ सप्टेंबर १८७०)

२०१४: भारतीय क्रिकेटर माधव मंत्री यांचे निधन. (जन्म: १ सप्टेंबर १९२१)

२०१४: भारतीय संगीतकार आणि दिग्दर्शक आनंद मोडक यांचे  निधन. (जन्म: १३ मे १९५१)

=========================================


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-23.05.2022-सोमवार.