शीर्षक ** बाप म्हणूनी **

Started by Sanjay Makone, May 23, 2022, 12:40:28 PM

Previous topic - Next topic

Sanjay Makone

खालील कवितेमध्ये कवीला आपल्या बापाविषयी वाटणारे मत या ठिकाणी व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे.खासकरून कवीला या ठिकाणी आपले बालपण आणि त्या बालपणी आपल्या बापाने आपले पुरविलेले लाड डोळ्यासमोर ठेवून शब्द रचना केली आहे.व त्याने आपल्यावर केलेल्या मायेची आठवण या द्वारे मांडण्याचा हा छोटासा प्रयत्न



** बाप म्हणूनी **


घेवूनी मज हिताचा ध्यास
तु मनोमन तळमळला,
बाप म्हणूनी जग दाखवी
तु मज नित्य पाठी राहिला.

तुझ्या दुःखा पांघर घालूनी
मज तू प्राणापरी जपला,
येता जाता तूझीच नजर 
भिर-भिर शोधसी मजला.

घोडा बनुनी पाठीवरती
गोल-गोल फिरविले मला,
जरी रांगता खाली पडला 
हट्ट माझा तुच पुरविला.

तुझी चिंता नयनी पाहिली 
हौस माझी पुरता-पुरता,
डोळे तुझेरे चिंब भरता
मी चोरून पहिले पुसता.

आई सारखा असेल कोणी
आठवण ज्याची क्षनोक्षनी,
तुझे स्थान हृदय मंदिरी 
निरंतर राहो माझ्या मनी.

                         Sanjay Makone
                           9623949907