२९-मे–दिनविशेष

Started by Atul Kaviraje, May 29, 2022, 12:56:12 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२९.०५.२०२२-रविवार. जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"


                                      "२९-मे–दिनविशेष"
                                     ------------------


अ) २९ मे रोजी झालेल्या घटना.
   -------------------------

१७२७: पीटर (दुसरा) रशियाचा झार बनला.

१८४८: विस्कॉन्सिन अमेरिकेचे ३० वे राज्य झाले.

१९१४: ओशियन लाइनर आर.एम.एस. इंप्रेस ऑफ आयर्लंड जहाज बुडून त्यात १९९२ लोक ठार झाले.

१९१९: अल्बर्ट आइनस्टाइन यांच्या सामान्य सापेक्षता सिद्धांताची चाचणी घेण्यात आली.

१९५३: एडमंड हिलरी व शेर्पा टेन्झिंग नॉर्गे यांनी दुपारी ११:३० वाजता माऊंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्‍च शिखर सर केले.

=========================================

ब) २९ मे रोजी झालेले जन्म.
  -----------------------

१९०५: भारतीय संगीत क्षेत्रातील अध्वर्यू गानहिरा हिराबाई बडोदेकर यांचा जन्म. (मृत्यू: २० नोव्हेंबर १९८९)

१९०६: भारतीय-इंग्लिश लेखक टी. एच. व्हाईट यांचा जन्म. (मृत्यू: १७ जानेवारी १९६४)

१९१४: एडमंड हिलरी याच्यासोबत सगळ्यात पहिल्यांदा एव्हरेस्ट शिखर सर करणारे शेर्पा टेन्झिंग नॉर्गे यांचा जन्म. (मृत्यू: ९ मे १९८६)

१९१७: अमेरिकेचे ३५ वे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांचा जन्म. (मृत्यू: २२ नोव्हेंबर १९६३)

१९२९: ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ पीटर हिग्ज यांचा जन्म.

=========================================

क) २९ मे रोजी झालेले मृत्यू.
   ----------------------

१८१४: नेपोलियन बोनापार्ट यांची पहिली पत्नी जोसेफिन डी बीअर्नार्नास यांचे निधन. (जन्म: २३ जून १७६३)

१८२९: विद्युत पृथक्‍करणाद्वारे सोडिअम आणि पोटॅशिअम ही मूलद्रव्ये प्रथमच वेगळी करणारे इंग्लिश भौतिक व रसायनशास्त्रज्ञ सर हंफ्रे डेव्ही यांचे निधन. (जन्म: १७ डिसेंबर १७७८)

१८९२: बहाई पंथाचे संस्थापक बहाउल्ला यांचे निधन. (जन्म: १२ नोव्हेंबर १८१७ – तेहरान, इराण)

१९७२: अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक पृथ्वीराज कपूर यांचे निधन. (जन्म: ३ नोव्हेंबर १९०१)

१९७७: भाषाशास्त्रज्ञ सुनीतिकुमार चटर्जी यांचे निधन. (जन्म: २६ नोव्हेंबर १८९०)

१९८७: भारताचे ५ वे पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांचे निधन. (जन्म: २३ डिसेंबर १९०२)

२००७: संगीतकार स्‍नेहल भाटकर यांचे निधन. (जन्म: १७ जुलै १९१९)

२०१०: समाजवादी विचारवंत, स्वातंत्र्यसैनिक ग. प्र. प्रधान यांचे निधन. (जन्म: २६ ऑगस्ट १९२२)

=========================================


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-29.05.2022-रविवार.