शिक्षक-शिक्षकांना करावे लागतेय आंदोलन,शिक्षणामुळेच होतंय समाजाचे परिवर्तन

Started by Atul Kaviraje, May 29, 2022, 01:07:30 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

           विषय :प्रलंबित  मागण्यांसाठी  शिक्षकांचे  ठिय्या  आंदोलन
                         वास्तव  शिक्षक  मागण्या  चारोळ्या
    "शिक्षकांना करावे लागतेय आंदोलन,शिक्षणामुळेच होतंय समाजाचे परिवर्तन"
   ------------------------------------------------------------------


(1)
आदराने  घेतलं  जातंय  गुरुचे  नाम
आई -वडिलांच्या   पटीत   आहे  त्याला  आज  स्थान
त्या  "शिक्षकाची"  आज  परवड  होतेय ,
आपल्या  हक्कांसाठी , मागण्यांसाठी त्याला  "आंदोलन"  करावे  लागतेय .

(2)
"गुरुजींची"  वाट  पाहून  वर्ग  कंटाळला  होता
विद्यार्थी -विद्यार्थिनींचा  संयम  सुटत  चालला  होता
उभ्याने  शिकवणारा  वर्गात  फळ्याजवळला  "शिक्षक" ,
आज  आपल्या  मागण्यांसाठी  वर्गाबाहेर  ठिय्या  देऊन  बसला  होता .

(3)
कोरोनाच्या  प्रसारामुळे  बंद  होत्या शाळा
खडूच्या  गिरबटीच्या  प्रतीक्षेत  उभा  होता  फळा
साऱ्या  "शिक्षकांचीही"  झाली  होती  वर्षभर  परवड ,
नोकरी  पुन्हा  मिळविण्यासाठी  त्यांची  चालली  होती  धडपड .

(4)
मागण्या  मान्य  होत  नाहीत ,पगार  पडतोय  अपुरा
शिकविता -शिकविता  अभ्यासही  राहिलाय  मुलांचा  अधुरा
मुलांच्या  शिक्षणाचे  काय , ज्यावर  भवितव्य  अवलंबून  ?
सर्वांचीच  काळजी  पडलीय  या  "शिक्षकास"  राहून -राहून .

(5)
नुसताच  ठिय्या  देऊन  उपयोग  नाही , "शिक्षकांनो"  !
तुमच्या  मागण्या  अश्याच  होत  राहतील  प्रलंबित
आता  वेळ  आलीय  प्रत्यक्ष  लढा  देण्याची ,
"शिक्षक"  दिनाला  गाऊन  आपुल्या  हक्कांचे  समर -गीत  !


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-29.05.2022-रविवार.