३०-मे–दिनविशेष

Started by Atul Kaviraje, May 30, 2022, 12:43:28 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-३०.०५.२०२२-सोमवार.जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"


                                      "३०-मे–दिनविशेष"
                                     ------------------


अ) ३० मे रोजी झालेल्या घटना.
   -------------------------

१५७४: हेन्‍री (तिसरा) फ्रान्सचा राजा बनला.

१६३१: पहिले फ्रेंच वृत्तपत्र गॅझेट डी फ्रान्सचे प्रकाशन झाले.

१९३४: मुंबई नभोवाणी केंद्राची सुरुवात.

१९४२: दुसरे महायुद्ध – इंग्लंडच्या १००० विमानांनी जर्मनीतील कोलोन शहरावर तुफानी बॉम्बहल्ला केला.

१९७४: एअरबस ए-३०० विमानांची सेवा सुरू झाली.

१९७५: युरोपियन स्पेस एजंसीची स्थापना झाली.

१९८७: गोव्याला राज्याचा दर्जा देण्यात आला.

१९९३: पु. ल. देशपांडे यांना त्रिदल' संस्थेच्या वतीने पुण्यभूषण पुरस्कार प्रदान.

१९९८: अफगाणिस्तान मधील ६.५ मेगावॅट क्षमतील भूकंपात ४००० ते ४५०० लोक ठार झाले.

=========================================

ब) ३० मे रोजी झालेले जन्म.
  -----------------------

१८९४: इतिहासकार डॉ. पांडुरंग सखाराम पिसुर्लेकर यांचा जन्म. (मृत्यू: १० जुलै १९६९)

१९१६: अत्यंत लोकप्रिय व प्रतिभावान चित्रकार दीनानाथ दलाल यांचा जन्म. (मृत्यू: १५ जानेवारी १९७१ – मुंबई)

१९४९: इंग्लिश जलदगती गोलंदाज बॉब विलीस यांचा जन्म.

१९५०: अभिनेते परेश रावल यांचा जन्म.

=========================================

क) ३० मे रोजी झालेले मृत्यू.
   ----------------------

१४३१: फ्रान्सला परकीय जोखडातून मुक्त करणार्‍या जोन ऑफ आर्कला चेटकीण ठरवून जाळण्यात आले. नंतर मात्र तिला संत ठरवले गेले. ती द मेड ऑफ ऑर्लिन्स या टोपणनावानेही ओळखली जाते. (जन्म: ६ जानेवारी १४१२)

१५७४: फ्रान्सचा राजा चार्ल्स (नववा) यांचे निधन. (जन्म: २७ जून १५५०)

१७७८: फ्रेन्च तत्त्वज्ञ व लेखक व्होल्टेअर यांचे निधन. (जन्म: २१ नोव्हेंबर १६९४)

१९१२: आपला भाऊ ऑर्व्हिल राईट याच्यासह इंजिनाच्या विमानाचा शोध लावणारे अमेरिकन अभियंते विल्बर राईट यांचे निधन. (जन्म: १६ एप्रिल १८६७)

१९४१: थायलँडचा राजा प्रजाधिपोक ऊर्फ राम (सातवा) यांचे निधन. (जन्म: ८ नोव्हेंबर १८९३)

१९५०: प्राच्यविद्या संशोधक दत्तात्रय रामकृष्ण भांडारकर यांचे निधन.

१९५५: भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक नारायण मल्हार जोशी यांचे निधन. (जन्म: ५ जून १८७९)

१९६८:चित्रकार सावळाराम लक्ष्मण हळदणकर यांचे निधन. (जन्म: २५ नोव्हेंबर १८८२)

१९८१: बांगलादेशचे ७ वे राष्ट्राध्यक्ष झिया उर रहमान यांची हत्या. (जन्म: १९ जानेवारी १९३६)

१९८९: शिख संतकवी दर्शनसिंहजी महाराज यांचे निधन. (जन्म: १४ सप्टेंबर १९२१)

२००७: भारतीय कवी आणि समीक्षक गुंटूर सेशंदर शर्मा यांचे निधन. (जन्म: २० ऑक्टोबर १९२७)

=========================================


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-30.05.2022-सोमवार.