चारोळ्या-साखरेने केले तोंड गोड आयुष्यभर,कटू-दिन आलेत आमच्यावर निवृत्तीनंतर

Started by Atul Kaviraje, May 30, 2022, 12:54:10 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

   विषय :कोल्हापूर येथील साखर कारखान्याच्या निवृत्त अधिकाऱ्यांचा अर्ध-नग्न मोर्चा
                           ( निवृत्त  अधिकाऱ्यांची  कैफियत )         
                  वास्तव- निवृत्ती-नंतरचे  अधिकार  मागण्या  चारोळ्या
     "साखरेने केले तोंड गोड आयुष्यभर,कटू-दिन आलेत आमच्यावर निवृत्तीनंतर"
------------------------------------------------------------------------
   

(1)
कपड्यांचे  नव्हते  आम्हाला  मुळीच  वावडे
की  कपडेही  नाही  घातले  आम्ही  कधीच  तोकडे
पण  आता  वेळच  आलीय  अशी  आमच्यावर ,
अर्ध -नग्न  फिरावयास  लागतंय  मागण्यांसाठी  "निवृत्तीनंतरही"  इकडे -तिकडे .

(2)
आता  हे  काय  वय  आमचे  फिरायचे  ?
साठी  उलटल्यावर  "निवृत्ती"  मागण्यांसाठी  हक्काच्या  आंदोलनाचे  ?
आजवर  सुरळीत  चालले  होते , कधीही  काढला  नव्हता  मोर्चा ,
अवस्था  झालीय  आज  आमची  जणू , ना  घरचा  ना  दारचा  !

(3)
आज  अश्या  अवस्थेत  फिरायची  मनापासून  वाटतेय  लाज
पण  जिथे  सरकारलाच  नाही ,तिथे  काय  करावे  बरे  आज  ?
कोल्हापूर , साखर  कारखान्यांचा  श्रीमंत  गाव  आहे  नावाजलेला ,
पण  आज  नाहीय  वाली  कुणी ,गरिबांची  कैफियत  ऐकायला  !

(4)
जोवर  असतो  नोकरीत , तोवर  समाजात  मान  असतो
"निवृत्ती"  नंतरच्या  जीवनात  कोणी  कोणास  विचारीत  नसतो
उपेक्षित ,दुर्लक्षित  असतो  तो  "निवृत्ती" , पण  असतो  समाजाचा  एक  घटक ,
उर्वरित  आयुष्याचा  हा  एक  न  संपणारा , संधिकाल -सायंकाळ  असतो .

(5)
भविष्यात  असे  कपड्यांविना  फिरावे  लागू  नये
पिकल्या  केसांची  कदर  करावी  सरकारने ,आपुलकीने
नातवंडांना  खेळावयाचे , त्यांच्यासवे  रमायचे  वय  आमचे ,
कृपया , मागण्या  आमच्या  करून  मान्य , दिवस  दाखवा  आम्हा  सुखाचे  !


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-30.05.2022-सोमवार.